MB NEWS-मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन यासाठी सदैव प्रयत्नशील - सौ. राजश्रीताई मुंडे बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताईंच्या हस्ते गौरव संगम ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांचे सौ. राजश्रीताईंच्या हस्ते लोकार्पण

 मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन यासाठी सदैव प्रयत्नशील - सौ. राजश्रीताई मुंडे




बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताईंच्या हस्ते गौरव



संगम ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांचे सौ. राजश्रीताईंच्या हस्ते लोकार्पण



परळी दि. (16) ---- : ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांना अधिकाधिक अर्थसहाय्य व उद्योगांना चालना देऊन परळी मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी मी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील आहे. यासाठी महिलांना यासाठी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत आपण करणार असल्याचे सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

परळी तालुक्यातील संगम येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या मार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संगम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या विविध विकासकामांसह येथील सभागृहाचे सौ. मुंडे ताईंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

 
यावेळी बचत गटांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सौ. राजश्रीताई मुंडेंच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून मानपञ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संगमच्या सरपंच वच्छलाबाई कोकाटे,  उपसरपंच गंगाधर नागरगोजे, माऊली तात्या गडदे, व्यंकट हरणावळ,सचिन हरणावळ, राजाभाऊ गिराम, युनुस बेग, अनिल कामाळे, रूक्षराज नागरगोजे, हनुमंत कामाळे, देविदास रोडे, पोलिस पाटील पांडुरंग रोडे, वसंत गायकवाड, विकास रोडे, प्रभाकर गिराम, मुक्तेश्वर गिराम,  सुरेश मुंडे यांच्या सह गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन तथा आयोजन रामेश्वर महाराज कोकाटे, अखिल भारतीय वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांनी केले होते. 

*यांचा झाला गौरव...*

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान परळी तालुका व्यवस्थापक कुणाल मुंडे, शोभा विरगट, शिल्पा मुपकलवार, वंदना गोदाम, निता गायकवाड, कविता संसारे, मनिषा वाघमारे, प्रभावती कराड, मंगल कडबाने, सिमा भद्रे, अनिता जाधव, वैशाली मुंडे, अकीलाबी सय्यद, आशा गुट्टे, वसुधा आघाव, करूणा शिंदे, ज्योती केंद्रे, विमल जाधव, कांता मुंडे, गोकर्णा शिंदे, मंगल मुंडे, रोहिनी खोडवे, पुजा कांबळे, वंदना भारती, शितल सातभाई, सरस्वती मुसळे, सुरेखा घोडके, पुजा वाघमारे, मिनाक्षी मुंडे, इंद्रायणी कराड, गंगासागर गव्हाणे, लता मुंडे, शैलेजा रूपनर, कालिंदा किरवले, जयश्री कराड, सुकन्या मगर, इंदुमती कांदे, वर्षा खराटे, विजयमाला गुट्टे, भाग्यश्री मुंडे, वर्षा मुंडे, ज्ञानेश्वरी कातकडे, मिरा कोकाटे, संगिता चव्हाण, जयश्री सलगर, सुरेखा सावंत, शोभा फड, शिवकन्या फड, मनकर्णिका फड, आदींचा सौ. राजश्री ताईंच्या हस्ते गौरव संपन्न झाला.

पुढे बोलताना सौ. राजश्रीताई यांनी कोरोनाच्या संकटापासून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे सर्वांना आवाहन केले. तसेच कोरोना मुळे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर गावांमध्ये भेटी देऊन आभार मानता आले, येत्या काळात आपण सर्व मतदारसंघातील महिलांचा एक आभार दौरा करणार असल्याचेही सौ. मुंडे ताई म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !