इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ !* 🕳️ _आरोग्य सेवा हाच खरा धर्म -नगराध्यक्षा सौ.हालगे_ 🕳️ *आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी- सभापती बालाजी मुंडे

 *आरोग्य सेवासप्ताह: महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ !*



🕳️ _आरोग्य सेवा हाच खरा धर्म -नगराध्यक्षा सौ.हालगे_

🕳️ *आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी- सभापती बालाजी मुंडे*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....आरोग्य सेवा सप्ताहामध्ये आज दि.१७ रोजी महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ झाला.शिबीरात मोठी गर्दी झाली होती. शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी आरोग्य सेवा हाच खरा धर्म असुन विविध आरोग्य सेवा गरजुंपर्यंत पोहचत आहेत ही मोठी उपलब्धी असल्याचे  नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे यांनी सांगितले.तर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी असल्याचे पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले.



        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आरोग्य सेवा सप्ताह सुरू आहे. या अंतर्गत महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे घेण्यात आले. शिबिरात डॉ.गुरुप्रसाद देशपांडे,डॉ.अजित केंद्रे,डॉ.रांदड डॉ.राजेश जाजू, डॉ.आनंद टिंबे,डॉ.अलका गित्ते,डॉ.सुवर्णा टिंबे यांनी आपली आरोग्यसेवा दिली.आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ झाला.शिबीरात मोठी गर्दी झाली होती. शिबिरार्थींना तपासणीनंतर मोफत औषधी वाटपही संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

       यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे,पंचायत समिती सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,अय्युब पठाण, महिला आघाडी च्या अध्यक्षा अर्चना रोडे, युवती अध्यक्ष पल्लवी भोयटे,शहर सरचिटणीस,अनंत इंगळे,अझीझ कच्छी,चित्रा देशपांडे, अन्नपूर्णा जाधव, उमाताई धुमाळ,गोदावरीताई पोखरकर,सुनीता बोडखे,वाघमारे मॅडम,लालाखान पठाण, बळीराम नागरगोजे, रामेश्वर महाराज कोकाटे,शंकर कापसे, रवी मुळे, प्रा.शामसुंदर दासूद, जमील अध्यक्ष,अमित केंद्रे,शरद कावरे,अमर रोडे,जितेंद्र नव्हाडे,कृष्णा डुबे,सुभाष वाघमारे,राज जगतकर,शिवलिंग  व्यवहारे,राजाभाऊ स्वामी, शेख मुख्तार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!