इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी ; पंचेचाळीस हजार रुपये लंपास*

 *किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी ; पंचेचाळीस हजार रुपये लंपास*



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  

         परळी- गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने शटर व कुलपे तोडून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटर व गल्ल्याची नासधुस केली तसेच गल्ल्या मधील रोख पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे.

           याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उड्डाण पुलालगत परळी- गंगाखेड रस्त्यावर फिर्यादी गजानन गंगाधर चिद्रवार यांचे किराणा मालाची सुपर शाॅपी आहे. दिनांक 18 रोजी सायंकाळी चार वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान चार कुलुप लावून बंद केले. दुकान बंद करत असताना गल्यात पंचेचाळीस हजार रुपये रोकड व उधारीच्या नावं असलेल्या चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. दिनांक 19 रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान उघडण्यास गेले असताना कुलूप तोडलेले आढळले. दुकानात गेले असताना गल्ल्यातील पंचेचाळीस हजाराची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून एक अनोळखी मुलगा दुकानात शिरल्याचे यामध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी चिद्रेवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास संभाजी नगर पोलिस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!