इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली 🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा

 देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली


🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..

         देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही वैद्यनाथ नगरीत दाखल झाल्या होत्या.



        एकादशी म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.पण सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.आज वैद्यनाथ मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात हे चित्र बघायला मिळाले. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्यात देवस्थानावरील अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडो शेकडो लोकांची घरे आता अस्वस्थ आहेत.



        कोरोनाकाळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर बंदच आहे.  आषाढी एकादशी निमित्त आज सकाळपासुन  परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर, विठ्ठल  मंदीर,संत  जगमिञनागा मंदिर, गणेश मंदिरात  बाहेरून दर्शन  घेतले आहे प्रभु वैघनाथाचा  दरवाजा  बंद आहे. मंदिर जरी बंद असले तरी भाविकांनी  मंदिराच्या पायरीचे  व कळसाचे  दर्शन   घेतले.मंदिर  परीसरात  सकाळपासुन  गर्दी  झाल्याचे दिसून  आले.  

संत जगमित्रनागा मंदिर येथे श्रंगारपुजा......



     दरम्यान,संत जगमित्रनागा मंदिर येथे श्रृंगारपुजा करण्यात आली होती.विठ्ठल रुक्मिणी व संत जगमित्रनागा यांच्या समाधीची विशेष पुजा व आरास मांडण्यात आली होती.आकर्षक श्रृंगारपुजा मन मोहित करणारी होती.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!