इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: उद्या सर्वरोग निदान शिबीर व कोव्हिशिल्ड लसीकरण मोहीम


आरोग्य सेवासप्ताह: उद्या सर्वरोग निदान शिबीर व कोव्हिशिल्ड लसीकरण मोहीम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.२१ रोजी सकाळी ९ वा.पासुन सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोव्हिशिल्ड लसीची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

         लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज बुधवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ९ वा.पासुन सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवासप्ताह च्या माध्यमातून कोव्हिशिल्ड लसीची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांना या शिबिरात सहभागी व्हावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अर्चनाताई रोडे,पल्लवी भोयटे,सुलभा साळवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!