इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-(video)आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांनी काढली वृक्षदिंडी

 आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांनी काढली वृक्षदिंडी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 
     शहरातील शास्त्रीनगर भागातील बालगोपाळांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रादूभावामुळे मंदिर व पंढरपूर वारी बंद असल्याने मंगळवारी (ता.२०) वृक्षदिंडी काढत झाडे लावण्याचा संदेश दिला. तर वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने भाविक भक्तांनी मंदिराच्या पायरीवर आपला माथा टेकून दर्शन घेतले.
                     वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला मोठे महत्त्व आहे. मात्र गेल्या वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमावर प्रतिबंध घातले आहेत. तसेच राज्यात मंदिरेही बंद करण्यात आली असल्याने वारकरी संप्रदायामध्ये सरकार विरोधात नाराजीचा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शास्त्रीनगर भागातील बालगोपाळांनी पारंपरिक पद्धतीने दिंडी काढत, हातात वृक्ष घेऊन झाडे लावण्याच्या संदेश दिला. झाडे लावा नैसर्गिक आँक्सीजन मिळवा अशा घोषणा देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच विठ्ठलाचा जयघोष बाळगोपाळांनी केला. या अनोख्या दिंडीचे गल्लोगल्लीत स्वागत करण्यात आले. या दिंडी मध्ये शास्त्रीनगर मधील बालगोपाळ टाळ, मृदुंग, वृक्ष घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!