MB NEWS-नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार ; 22 जुलै पासून परळी-अदिलाबाद पॅसेंजर होणार सुरू

 *नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार ; 22 जुलै पासून परळी-अदिलाबाद पॅसेंजर होणार सुरू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे सेवा आता हळुहळु सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार आहेत. यामध्ये परळी मार्गावरील महत्त्वाची परळी-अदिलाबाद पॅसेंजर 22 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे.

            22 जुलै पासून गाडी क्र. 57554 अदिलाबाद- परळी डेमू लोकल अदिलाबाद येथून सकाळी 3.30 ला निघून अखेर परळी येथे दुपारी 12.40 ला पोहोचणार आहे. परतीत त्याचं दिवशी गाडी क्र. 57551परळी- अदिलाबाद डेमू लोकल परळी येथून दुपारी 3.45 वाजता निघून अखेर अदिलाबाद स्थानकावर रात्री 11.55 ला पोहोचणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.परळी मार्गे धावणार्या अनेक गाड्या बंदच आहेत.मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद असलेल्या १२ पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या रेल्वे सुरू झाल्या तर प्रवासी संख्या जास्त होईल. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल. या कारणामुळे पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. आता काही प्रमाणात गाड्या सुरू करण्यात येत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

  🕳️  परळी-अदिलाबाद असणार डेमु गाडी.....

        दरम्यान परळी-अदिलाबाद  डेमु गाडी असणार आहे.डेमु रेल्वे गाडी म्हणजे डिझेल इंजिनवर धावणारी गाडी असते.दोन्ही टोकांना लहानसे इंजिन असते.डब्बे हे लोकल सारखे असतात. गर्दी होऊ नये, सामाजिक अंतर राखले जावे यादृष्टीने लोकलसारखे डब्बे असलेली ही गाडी सुरू होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !