MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा*

 *ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा*



अंबाजोगाई (दि. 17) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व विविध योजनेतील लाभार्थी यांचा गौरव सोहळा संपन्न झाला. 



या कार्यक्रमास आ. संजयभाऊ दौंड जि.प. उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि.प. गटनेते अजयजी मुंडे, गटविकास अधिकारी संदीप घोनसीकर, पं.स. सभापती अलिशान पटेल, मा.उपसभापती तानाजीभैय्या देशमुख, राष्ट्रवादी पक्षाचे ता.अध्यक्ष ताराचंद शिंदे, जि.प.सदस्य शंकरअन्ना उबाळे, जि.प. सदस्य बालासाहेब शेप, अंजलीताई पाटील आदि मान्यवर उपस्थित होतेया कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या उत्पन्नातील पाच टक्के राखीव निधीतून प्रत्येकी एकवीस हजार रुपये किमतीच्या आठ पिठाच्या गिरण्या देण्यात आल्या. पंचायत समिती अंतर्गत वैयक्तिक विहिरी मंजूर करण्यात आलेल्या 11 लाभार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल पूर्ण केलेल्या सात लाभार्थ्यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.पंचायत समितीच्या उमेद कक्षामार्फत संपूर्ण तालुक्यात बचत गट स्थापना व बळकटीकरण करण्यात येते. त्याअंतर्गतच बर्दापूर येथील संत सावतामाळी बचत गट या आदर्श गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला आणि प्रातिनिधिक स्वरूपावर दिड लाख रुपयाचे बँकेकडील कर्ज मंजुरी आदेश पत्र देण्यात आले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार