इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*🚩🚩भक्तीमय पंढरपूर; भाविकांविना संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर विसावले*

 *🚩🚩भक्तीमय पंढरपूर; भाविकांविना संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर विसावले*

------------------------------------------ 


पंढरपूर  - गरिबांचा देव म्हणून परिचित असलेल्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. मोजकेच भाविक व प्रमुख दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  भाविकांविना  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सह रुक्मिणी माता, सोपान काका, एकनाथ महाराज, चांगावाटेशवर, संत मुक्तबाई आदी पाच पालख्या वाखरी पालखी तळावर विसावले आहे. 

याञा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली. पालखी तळावर पालख्या आल्यावर सर्व भाविकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.त्यानंतर भाविक हिरव्यागार तळावर विसावा घेत आहेत. त्यानंतर भोजन, भजन कीर्तनात भावीक तल्लीन होत आहेत. भाविक मोजके असूनही उत्साह कणभर ही कमी दिसत नाही.


यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल‌ बेल्हेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!