इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: सर्वरोग निदान शिबीरात 1200 नागरिकांची तपासणी ; सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान

 _उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_



*आरोग्य सेवासप्ताह: सर्वरोग निदान शिबीरात 1200 नागरिकांची तपासणी ; सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.२० रोजी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 1200 नागरिकांची तपासणी करून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषधी वाटपही करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध स्तरांवर कोविड प्रतिबंधक उपाययोजना काळात सेवा बजावणार्या सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान करण्यात आला.





         लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज मंगळवार दिनांक २० रोजी सर्वरोग निदान शिबीर झाले. ड्रगीस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे परळी अध्यक्ष सतीश जगताप यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. आनंद टिंबे,डॉ. ज्ञानेश्वर ढाकणे, डॉ. संभाजी मुंडे व सर्व पैरामेडिकल स्टाफ यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान यावेळी करण्यात आला.कोविड प्रादुर्भावमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महावीर बडेरा, नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे,शंकर साळवे, विद्युत विभाग प्रमुख डी.व्ही.गुट्टे,पाणी पुरवठा विभाग प्रमुख शरणंम ताटे, नळजोडणी प्रमुख सिद्धेश्वर घोंगडे,प्रॉपर्टी मोजणी प्रमुख नरहरी डांगे, अतिक्रमण विभाग प्रमुख अशोक दहीवडे,नावनोंदणी प्रमुख राजकीरण उपाडे तसेच परळी शहरातील सर्व आशा वर्कर्स,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेले सर्व शिक्षक व आश्रम शाळेतील सर्व कोविड कार्यसेवा केलेले शिक्षक वैद्यनाथ गॅस डिस्ट्रिब्युटर चे माऊली चिकणे व सहकारी आदींचा ना.धनंजय मुंडे साहेबांची स्वाक्षरी असलेले "सेवाधर्म" सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.तसेचनाथ प्रतिष्ठान द्वारा आयोजित कोविड रुग्णांना मोफत भोजन व्यवस्था करण्याच्या सेवेत असलेले पदाधिकारी यांचा ही विशेष गौरव करण्यात आला.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुब पठाण होते.यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन कुलकर्णी, सामाजिक न्याय सेल चे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावंत,माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना रोडे,राधाकृष्ण साबळे, माजी नगरसेवक अजिज कच्छी,महेंद्र रोडे, रवि मुळे,लालाखान पठाण,के. डी उपाडे,चित्राताई देशपांडे, सुनिता बोडके, उमाताई धुमाळ, बळीराम नागरगोजे, प्रा. श्याम दासुद, शरद कावरे, शशी बिराजदार,राहुल जगतकर सर, अमर रोडे, अमित केंद्रे, राज जगतकर, शेख मुख्तार, जितेंद्र नव्हाडे,धम्मा अवचारे, ज्ञानेश्वर होळंबे, पवन फुटके, धनंजय शिंदे, प्रदिप जाधवर, रावसाहेब जगतकर,गोदावरी पोखरकर, ज्ञानोबा मस्के आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....