MB NEWS-विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

 *विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

परळी वै : दि 17 प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) संघटनेच्यावतीने विविध मागण्या संदर्भात सोमवार दि 19 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भूमिहीन शेतमजुरांना गेल्या कोविड १९ च्या  टाळेबंदी पासून अद्याप पर्यंत शेतमजुरांना रेशन मिळाले नाही.पेन्शन धारकांना जी पेन्शन मिळते त्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाही अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही यात शासनाने अनेक जाचक अटी लावून सर्व गरिबांना शेतमजुरांना योजना मिळण्यापासून दूर ठेवण्याचे काम सरकारने व्यवस्थितपणे चालविले जात आहे .तेव्हा या विरुद्ध खालील मागण्यासाठी दि १९जुलै २०२१ रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

1) विभक्त झालेल्या कुटुबांना तत्काळ रेशन वाटप करा.

२) परळी तालुक्यातील प्रत्येक गावातील " ड " यादीमध्ये असलेल्या कुटुबांना तत्काळ घरकुल वाटप करा.

३) " ड " यादीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव नाही त्या लोकांचा योग्य सर्वे करून त्यांचा घरकुलाच्या यादीत समावेश करून त्यांना घरे द्या.

4) श्रावणबाळ, सं.गा यो वृद्धापकाळ इत्यादी नि.यो.या योजनेचा लाभार्थ्यांना २१००० हजारच्या उत्पन्नाची जाचक अट रद्द करा व अनुदान चालू करा.

5) रोजगार हमीचे जॉबकार्ड विभक्त कुटुंबांना वाटप करा.

६) बेघर भूमिहीन शेतमजूर गायरानात घरे बांधून आहेत त्या जागा त्यांच्या नावे करून त्यांना तत्काळ PTR द्या.

7) जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवा.

8) श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना या निराधार पेन्शन धारकांना 3000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे.

 सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लाल बावटा संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष कॉ.सुदाम शिंदे,परळी तालुका अध्यक्ष कॉ.सखाराम शिंदे,धम्मानंद वाव्ह्ळे कॉ.पंडित शिंदे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार