पोस्ट्स

MB NEWS-अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज

इमेज
  अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज मुंबई;  :  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना भाऊबीज भेटीपोटी राज्य सरकारतर्फे 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांमधील कुपोषणाशी लढण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली असून सध्या राज्यात 10 लाख 8 हजार 5 अंगणवाड्या, मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. तसेच राज्यात सध्या 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत. राज्यात 1 लाख 89 हजार 277 अंगणवाडी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये अदा करण्यात येतात. त्यानुसार 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांना मागील वर्षाप्रमाणे 2 हजार रुपये भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता 37 कोटी 85 लाख 54 हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर भाऊबीज कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

MB NEWS-●जोशींची तासिका●नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्याखालचा राजकीय गेम..!

इमेज
  नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्या खालचा राजकीय गेम..!   ● जोशींची तासिका र मेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये भाजपने उमेदवारी जाहीर करून, अर्ज भरून त्यांचे उमेदवार मुरजी पटेलांना अर्ज वापस घ्यायला लावला हे आता काही तासांत जुने झाले आहे. तो अर्ज वापस घेताना भाजपने नैतिकता, संस्कृती, प्रथा असे जड शब्द वापरले आहेत. ज्यात मुळीच तथ्य नाही. उद्धव ठाकरेंना नामोहरम करायचे असेल तर त्यांच्याकडील शिवसेना पक्षाचे नावं, चिन्हाला धक्का लावणे आणि सध्या प्रशासक असलेली मुंबई मनपा ताब्यात घेणे हे मोठे टार्गेटस अचिव्ह करणे भाजपला क्रमप्राप्त आहे. या पोटनिवडणुकीत अधिकृत शिवसेना नावं आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवून भाजपने आपले पहिले टार्गेट पूर्ण केले. त्यानंतर या निवडणुकीत ज्या पद्धतीने राज ठाकरेंना पुढे करून मुंबईत पॉवर सेंटर मातोश्री नाही तर शिवतीर्थ असेल असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. १५ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जातात. मग १६ ऑक्टोबर रोजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतात. नंतर राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना "प्रिय मित्र" म

MB NEWS-यावर्षी शास्त्रीयदृष्टया दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते

इमेज
  दाते पंचांगकर्ते यांची दिवाळीबाबत महत्वपूर्ण माहिती यावर्षी शास्त्रीयदृष्टया  दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते           वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी आहे तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (धनत्रयोदशी विषयी सविस्तर खुलासा दाते पंचांगात पान ८९ वर दिलेला आहे.) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी एका दिवशी आलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. ग्रहणाचे दुसरे दिवशी 26 ऑक्टोबर रोजी

MB NEWS-परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

इमेज
  परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यांचा उपक्रम               परळी वैजनाथ,दि.17( प्रतिनिधी ) कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन , दिल्ली व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.16आक्टोबर 2022 रोजी परळी तालुक्यातील अनेक गा्वांमध्ये कैंडल मार्च काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे दुष्परिणाम ,आरोग्यविषयक निर्माण होणा-या  समस्या आदी विषयांवर या जनजागृती रैलिच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यात आले. महिला,मुले, पुरुष आणि काही ठिकाणी वृध्द अशा सर्वांनी या अभियानात आपले योगदान दिले.परळी तालुक्यातील सरफराजपूर,करेवाडी ,वडखेल ,सेलू (स),परचुंडी, देशमुख टाकळी यासह दहा ते अकरा गावांमध्ये हे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.          सन२०११च्या जनगननेेनुसार  महाराष्ट्रात 11लाख 60 हजार 665 बालविवाह झाले आहेत.देशातील एकूण बालविवाहापैकी ते 10 टक्के होते.बालविवाहाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.ए

MB NEWS-शिवाजीराव देशमुख यांचे निधन

इमेज
  शिवाजीराव देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ- परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विठ्ठलराव देशमुख (पोहनेरकर- वय ७८) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने परळीतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  परळीतील स्नेहनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. औरंगाबाद खंडपीठातील अॅड. सचिन देशमुख व वैद्यनाथ विद्यालयातील शिक्षक नेताजी देशमुख यांचे ते वडील होत.         त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास

इमेज
  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास                      परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार मांडला असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले असून सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक बनली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशी मागणी होत असताना भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना व्यथीत करणारी परिस्थिती निर्माण झालेली असून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल असा विश्वास  व्यक्त केला आहे.          भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था परतीच्या पावसाने व अतीवृष्टीने व्यथीत करणारी झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार निश्चित उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या माध

MB NEWS-वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य.

इमेज
  वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य  परळी. वै.-.                       ‌     ‌                 वाचन हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग असून खऱ्या अर्थाने चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे वाचन हे एकच माध्यम आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य यांनी केले.                             येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती भारतरत्न  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री आचार्य "वाचन संस्कृतीचे संवर्धन"  या विषयावर बोलत होते.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ. डी. व्ही. मेश्राम हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात बोलतांना श्री आचार्य यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी हे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. त्यावेळी ते म्हणाले की वाचन हे माणसाचे आयुष्य घडविते. वाचनामुळेच संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. तसेच ज्ञानाच्या कक्षादेखील रुंदावतात. महापुरुषांच्या चरित्रवाचना

MB NEWS-राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी -सोनपेठ ते इंजेगाव पर्यंतचे काम सुरू करुन जलद गतीने पूर्ण करणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

इमेज
 🔸 राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी -सोनपेठ ते इंजेगाव पर्यंतचे काम सुरू करुन  जलद गतीने पूर्ण करणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी   • माजी आमदार आर. टी. देशमुख व भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन    सोनपेठ, प्रतिनिधी...        राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी पाथरी- सोनपेठ ते इंजेगाव किलोमीटर 58/500 ते 00/84 या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे या प्रमुख मागणी सोबतच श्रीक्षेत्र गुंज संस्थान या राष्ट्रीय महामार्गाशी जोडावे, गोदावरी नदीवर गुंज येथे पूल बांधणी करणे आणि गंगामसला - गुंज ते वाघाळा रस्ता निर्माण करणे आदी विविध मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सकारात्मक असून जलद गतीने ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.            माजी आमदार आर. टी. देशमुख व परभणी जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन लवकरा

MB NEWS-मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडण बिनविरोध

इमेज
  मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडण बिनविरोध  भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा अंधेरी पोटनिवडणुकीसंबंधी भाजपाचा मोठा निर्णय भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली. राज ठाकरेंनी फेटाळली भाजपाची विनंती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत

MB NEWS-कॅमे-यात चोरी कैद: शेजारच्या इमारतीवरून चढला;तीन कुलपं तोडले;दीड लाखाचा ऐवज पळविला

इमेज
  कॅमे-यात चोरी कैद: शेजारच्या इमारतीवरून चढला;तीन कुलपं तोडले;दीड लाखाचा ऐवज पळविला       परळीत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठेत टेलर लाईन येथील आशिष तातेड यांच्या निवासस्थानी चोरीची घटना शनिवारी घडली असून यामध्ये दीड लाख रूपयांचा ऐवज चोरी गेला आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परळी शहरातील टेलर लाईन परिसरात वर्धमान ज्वेलर्सच्या वर आशिष कचरूलाल तातेड यांचे निवासस्थान असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. त्यांच्या शेजारी असलेल्या एका इमारतीवरून चोरट्याने घरात प्रवेश करुन त्याने तीन कुलूपे तोडून घरामध्ये प्रवेश केला घरात असलेल्या जुन्या  तिजोरी उघडल्या गेल्या असून त्यामधील चांदीचे क्वाईन (एक किलो) चोरट्याने लंपास केले आहेत. घरात काहीच हाती लागले नाही म्हणून शेवटी चोरट्याने सोबतच लॅपटॉप सुद्धा चोरी केला  आहे. याबाबत परळी संभाजीनगर परिसर गुन्ह्याची नोंद झाली असून चौकशी व तपास सुरू आहे.

MB NEWS-ठाण्याच्या जिल्हा बाल न्याय मंडळात परळीची भूमिकन्या कार्यरत

इमेज
  ठाण्याच्या जिल्हा बाल न्याय मंडळात  परळीची भूमिकन्या कार्यरत परळी वैजनाथ, प्रतिनिधी..            महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने  ठाणे जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या बाल न्याय मंडळाचे गठन करण्यात आलेले आहे. यामध्ये परळीच्या भूमिकन्या असलेल्या शिल्पा पाठक- नेलवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळात त्या कार्यरत असून  याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.        शिल्पा पुरुषोत्तम पाठक (शिल्पा श्रीकांत नेलवाडकर)या परळीतील सर्व परिचित पुरुषोत्तम वसंतराव पाठक यांच्या कन्या आहेत.परळी वै. येथे  सन 2004 साली त्यांनी परळी कोर्टात प्रॅक्टीस केली. लग्न झाल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्हयात वकील म्हणून काम केले. तसेच गोर, गरिबांकडून पैसे न घेता केवळ समाजसेवा म्हणून यांनी वकिली केली. तसेच लिगल अॅडव्हाईस मधून बऱ्याच अत्याचारीत महिलांना त्यांनी न्याय मिळून दिला. तसेच अनेक संसार फारकत न होता सौख्यांत कसे  राहायच याबद्दल त्यांनी बऱ्याच कुटुंबांना मार्गदर्शन केले. तसेच  नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपुर येथे लॉ ऑफीसर म्हणून काम केले.       सध्

MB NEWS-वीज पडून शेतकरी मृत्युमूखी

इमेज
  वीज पडून शेतकरी मृत्युमूखी केज :- केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गप्पेवाडी ता. केज येथील ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) हे रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास शेतातून जनावरे घेऊन घराकडे घेऊन येत असताना विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी अचानक ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे नातेवाईक श्रीमंत विठ्ठल केदार यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ नुसार आकस्मिक मृत्यू २५६/२०२२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.  या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.

MB NEWS-किसान सभा जिल्हा कचेरीवर करणार निदर्शने आंदोलन*

इमेज
 ■ किसान सभा जिल्हा कचेरीवर करणार निदर्शने आंदोलन ● अनुदान व पीकविमा मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने आंदोलनात सामील व्हावे - कॉम्रेड अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी जून मध्ये पडलेली पावसाची संततधार, जुलै - ऑगस्ट मध्ये पावसाचा खंड व आता परतीच्या पावसाने झालेली सोयाबिनची माती व कापसाच्या वाती व बाजरी, तूर, मूग ईतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे, या भयाण स्मशान परिस्थितीत शासनाने व विमा कंपनीने आतापर्यंत अनुक्रमे अनुदान व विमा अग्रीम शेतकऱ्यांना द्यावयास हवा होता. शासनाने २ शासन निर्णय काढले परंतु एकातही बीड जिल्ह्याला मदत मिळाली नाही. जिल्हाधिकार्यांनी ४७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी अधिसूचना काढली, त्यातही फक्त २८ महसूल मंडळाला कंपनीने विमा देणार असे सांगितले आणि बाकी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले एवढं कमी होतं म्हणून की काय? परतीच्या पावसाने जिल्हाभर हाहाकार माजवला, प्रशासन पंचनाम्याचे घोडे नाचवत आहे, शासन ई-पीक पाहणीची ढाल पुढे करतय, विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी होत नाहीत, कायम सर्व्हर डाऊन असतो. या भीषण वास्तवापुढे केज तालुक्यातील राजेगाव येथील शेतकऱ

M B NEWS-माधव (आप्पा) जाधव यांच्या वाढदिवस कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती

इमेज
माधव (आप्पा) जाधव यांच्या वाढदिवस कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने परळी मतदारसंघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध विधीज्ञ माधव जाधव यांचा वाढदिवस परळी येथे मोठ्या उत्साहात व हजारो हिताचींतकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.   .     माधव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परळी  येथे भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत वैद्यकीय, शिक्षण, व्यापारी, शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचे आयोजन माधव (आप्पा) जाधव मित्रपरिवार यांनी सुंदररित्या केले होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेस ,संभाजी ब्रिगेड ,भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एम आय एम, वंचित बहुजन आघाडी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह सर्व राजकीय पक्ष संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Click:-  ● *पहा थेट*● MB NEWS: • *LIVE-*

MB NEWS-प्रा सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

इमेज
  प्रा सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात  पीएच.डी. प्रदान परळी प्रतिनिधी - प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-समीक्षक व संशोधक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने आंतरविद्या शाखाअंतर्गत नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,नाट्यशास्त्र विभागातील संशोधन मार्गदर्शक डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास' या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे  विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते तर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मिता साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. या यशाबद्दल स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव चोथे, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचे प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,कोषाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे,सचिव श्री.विनायक चोथे, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,कनिष्ठ महाविद्य

MB NEWS-२२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
  २२ वर्षीय तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या  गेवराई :  तालुक्यातील धोंडराई येथील २२ वर्षीय तरूणाने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास पोलिस करत आहेत.      मयुर हजारे वय २२ राहणार धोंडराई असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नावं असुन त्याने शनिवार रोजी दुपारी शहरा जवळील बायपास जवळील एका शेतातील झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याचा तपास साजेद सिद्दीकी हे करत आहेत.

MB NEWS-पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा

इमेज
  पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा परळी / प्रतिनिधी सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिक विमा देण्यात यावा व अतिवृष्टीगस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. दि 11 ऑक्टोबर पासून सातत्याने परळी तालुक्यातील विविध महसूल मंडळात अतिवृष्टी होत आहे. यामुळे काढणीस आलेले काढून ठेवलेले सोयाबीन, बाजरी, इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते आणखीही पाऊस असाच पडत पडणे सुरूच आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसाना संदर्भातील तक्रारी 72 तासाच्या आत दाखल केलेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण व तक्रारींचे व्यापकप्रमाण पहाता पिकपंचनाम्यांच्या फेन्यांत वेळ काढू धोरण अवलंबता" च्या आधारे तातडीने अडचणीतल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करावे व शासनाकडूनही या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत द्यावी. महावेब पोर्टल वरील पावसाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असली तरी

MB NEWS-.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट

इमेज
ह.भ.प. बंडातात्या कराडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट वारकरी संप्रदायातील अग्रणी कीर्तनकार व वेळोवेळी वारकऱ्यांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका घेणारे संतवीर ह भ प बंडा महाराज कराडकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत   ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील अग्रणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.पंढरपूर येथून वाहणारी चंद्रभागा,आळंदी येथून वाहणारी इंद्रायणी व कृष्णा कोयना या नद्यांमध्ये होत असलेले वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.

MB NEWS-पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर युवकाचे प्रेत अखेर सापडले

इमेज
  पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर  युवकाचे प्रेत अखेर सापडले परळीच्या फायर ब्रिगेडच्या टीमने लावला प्रेताचा शोध  दिंद्रुड येथील तिन युवक एका पिकअप वाहनात अंबाजोगाई येथे फटाक्यांचा माल आणण्यासाठी जात असताना पुराच्या पाण्यात पिकअप वाहनासह बुडाले होते.यातील दोन युवकांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले मात्र एक युवक बेपत्ता झाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी बेपत्ता तरुण शोधण्याचे काम केले मात्र त्यांना अपयश आले होते. शनिवारी सकाळ पासून दिंद्रुड येथील जवळपास 400 ते 500 तरुणांसह शोध कार्य सुरू असताना परळी येथील अग्निशमन दलाला प्रेत सापडण्यास यश आले आहे. रईस अन्सर आत्तार वय 35 वर्ष बेपत्ता युवकाचे नाव असून तो मृत अवस्थेत आज दुपारी दोन वाजता घटनास्थळापासून नजदीक अंतरावर एका बंधार्यातील गाळात अडकलेल्या अवस्थेत सापडला. अग्निशमन दलातील अधिकारी दिनेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांची टीम शनिवारी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान घटनास्थळावर पोहोचली होती. धारूर येथील तहसीलदार दत्ता भारस्कर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप ब

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी संरक्षक भिंतीसह मंदिरातील मूर्ती शिल्पांवर होणार रासायनिक प्रक्रिया मंदिरासाठी मंत्री असतांनाही दिला होता ५ कोटीचा निधी परळी वैजनाथ । दिनांक १४। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे धर्मापूरी येथील प्राचीन केदारेश्वर मंदिरातील मूर्तीशिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी  पर्यटन खात्याने १ कोटी ८६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.    तालुक्यातील धर्मापूरी येथे प्राचीन केदारेश्वर मंदिर आहे, या वास्तुची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने  पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असतांना पर्यटन खात्याकडून  मंदिराच्या पूनर्निर्माणासाठी ५ कोटीचा निधी दिला होता, त्यातून बरीचशी कामे देखील झाली. मंदिरात अनेक प्राचीन शिल्पं, मूर्त्या आहेत त्याचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आता पुन्हा एकदा पंकजाताईंनी पर्यटन विभागाला सांगून १ कोटी ८६ लाख ४८ हजार रूपये मंजूर करून दिले आहेत. यातून राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या मूर्ती शिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे व संरक्षक भिंत बांधणे

MB NEWS- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

इमेज
धनंजय मुंडेंची सरकारला भावनिक साद ! अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे - धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट परळी (दि. 15) - मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारकदृश्याची पाहणी करायला या असे नम्र आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत असलेले सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला असून पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल; असेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे.  बळ

MB NEWS-संघर्ष योद्धा - ॲड.माधव जाधव वंचित, उपेक्षित आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारं खंबीर नेतृत्व

इमेज
  संघर्ष योद्धा - ॲड.माधव जाधव वंचित, उपेक्षित आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारं खंबीर नेतृत्व एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या जिद्द, चिकाटी, मुत्सद्दीपणा उराशी बाळगून आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर अंबाजोगाई आणि परळी परिसरात न्यायालयीन, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वबळावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या घाटनांदूरच्या भूमीपुत्राला अर्थात ॲड.माधव जाधव यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!! *मोडलेल्या माणसांचे, दुख ओले झेलताना...* *अनाथांच्या उशाला, दिप लावु झोपताना...* *कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना...* *दु:ख ओले दोन आश्रु, माणसांचे माणसांना...*       या सुवचनाची जाणीव असलेल्या; ॲड.माधव जाधव यांनी बालवयात स्वत: प्रतिकुल व विषम परिस्थितीचा अनुभव घेतला असल्याने सामाजिक जाणिव समोर ठेवून जय भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गतकाळात अनेक वर्षे घाटनांदूरच्या सर्व शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना दिलेली वृक्ष संवर्धन शिष्यवृत्ती, ज्यांत गणवेश, स्कुलबॅग, वह्या, कंपास, एक्झाम पॅडचा समाव

MB NEWS- *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने !*

इमेज
 *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने ! परळी वैजनाथ :- दिपावलीसाठी सातव्या वेतन आयोगा च्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून  नगर परिषद सेवा निवृत कर्मचाऱ्यांनी आज  (14 ऑक्टोबर) रोजी निदर्शने  केली. हे सेवा निवृत कर्मचारी  17ऑक्टोबर  पासून न.प. कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन  करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे यानी पत्राद्वारे दिली आहे.           सेवानिवृत कर्मचाऱ्यांची सेवा उपदान व रजारोखीकरण रक्कम मिळावी म्हणून 18.7.22 रोजी दिवसभर उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनातील दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी रक्कम दिली नाही. लेखी आश्वासनाची पूर्तता करा म्हणून 10 आगस्ट रोजी पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आश्वासन न पाळणारे मुख्याधिकारी परळी शहराला पहिल्यांदाच मिळाले आहेत.याबाबत  सेवानिवृत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.18.7. 22 रोजी दोन महीन्यात 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता देउ असे लेखी देऊनही अद्याप दिला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त  कर्मचा

MB NEWS-कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट

इमेज
  कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट                  परळी वैजनाथ.....       स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग अधिक सहजपणे, सोप्या पद्धतीने समजावेत, त्यातील संकल्पना, सिद्धांत लक्षात यावेत यासाठी डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विविध असे 100 च्या जवळपास प्रयोग करून पाहिले.  शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळासह विज्ञान मंडळही असून या मंडळामार्फत आठवड्यात एकदा प्रयोग करून दाखवले जातात.

MB NEWS-बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नवीन सरकारचा विक्रम

इमेज
  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नवीन सरकारचा विक्रम  *अतिवृष्टी निकषात न बसलेल्या नुकसानीपोटी 9 जिल्ह्यांना 755 कोटींची मदत, बीड जिल्ह्याचा समावेश, पण मदत मात्र 17 लाख!* *याआधीच्या मदतीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत नाही, सांगा सरकार दिवाळी कशी करायची? - धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल* परळी (दि. 13) - अतिवृष्टी व पावसाने शेती पिकांचे झालेले नुकसान त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यात राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज 755 कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमधून केवळ 17 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे. याआधीही अतिवृष्टी व गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीची आकडेवारी पाहता नव्या राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा विक्रम केला असल्याची टीका माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी केली आहे.  महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या परंतु पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्य