MB NEWS-पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर युवकाचे प्रेत अखेर सापडले

 पुरात वाहून गेलेल्या रईस अन्सर आतर  युवकाचे प्रेत अखेर सापडले



परळीच्या फायर ब्रिगेडच्या टीमने लावला प्रेताचा शोध


 दिंद्रुड येथील तिन युवक एका पिकअप वाहनात अंबाजोगाई येथे फटाक्यांचा माल आणण्यासाठी जात असताना पुराच्या पाण्यात पिकअप वाहनासह बुडाले होते.यातील दोन युवकांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले मात्र एक युवक बेपत्ता झाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी बेपत्ता तरुण शोधण्याचे काम केले मात्र त्यांना अपयश आले होते. शनिवारी सकाळ पासून दिंद्रुड येथील जवळपास 400 ते 500 तरुणांसह शोध कार्य सुरू असताना परळी येथील अग्निशमन दलाला प्रेत सापडण्यास यश आले आहे.

रईस अन्सर आत्तार वय 35 वर्ष बेपत्ता युवकाचे नाव असून तो मृत अवस्थेत आज दुपारी दोन वाजता घटनास्थळापासून नजदीक अंतरावर एका बंधार्यातील गाळात अडकलेल्या अवस्थेत सापडला. अग्निशमन दलातील अधिकारी दिनेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांची टीम शनिवारी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान घटनास्थळावर पोहोचली होती.

धारूर येथील तहसीलदार दत्ता भारस्कर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड घटनास्थळी तळ ठोकून होते. प्रेताच्या उत्तरीय तपासणीसाठी शिरसाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार