MB NEWS- *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने !*

 *सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या मागणीसाठी नगर परिषद सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने !


परळी वैजनाथ :- दिपावलीसाठी सातव्या वेतन आयोगा च्या फरकाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून  नगर परिषद सेवा निवृत कर्मचाऱ्यांनी आज  (14 ऑक्टोबर) रोजी निदर्शने  केली. हे सेवा निवृत कर्मचारी  17ऑक्टोबर  पासून न.प. कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन  करणार आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे यानी पत्राद्वारे दिली आहे. 

         सेवानिवृत कर्मचाऱ्यांची सेवा उपदान व रजारोखीकरण रक्कम मिळावी म्हणून 18.7.22 रोजी दिवसभर उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनातील दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी रक्कम दिली नाही. लेखी आश्वासनाची पूर्तता करा म्हणून 10 आगस्ट रोजी पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आश्वासन न पाळणारे मुख्याधिकारी परळी शहराला पहिल्यांदाच मिळाले आहेत.याबाबत  सेवानिवृत कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.18.7. 22 रोजी दोन महीन्यात 7 व्या वेतनाचा दुसरा हप्ता देउ असे लेखी देऊनही अद्याप दिला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त  कर्मचारी यांनी आज 14  रोजी नगर परिषदेत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात  अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे सचिव जगन्नाथ शहाणे, नारायण भोसले, रहीमभाई, सय्यद ताहेर, त्रिंबक शिंदे, अर्जुन शिंदे, उत्तम सावजी,श्रीमंत  लव्हारे आदींसह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त  कर्मचारी   सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार