युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

धनंजय मुंडेंची सरकारला भावनिक साद !

अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे - धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट


परळी (दि. 15) - मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारकदृश्याची पाहणी करायला या असे नम्र आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.


सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत असलेले सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला असून पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल; असेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे. 


बळीराजा बनवल्या जाणाऱ्या अन्नदात्याच्या पाठीचा कणा नैसर्गिक संकटाने मोडून पडला असून या शेतकऱ्यांना सरकारने आधार व मदत देण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.


दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान पावसामुळे नुकसान झाले परंतु अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही अशा शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील नऊ जिल्ह्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली व त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 17 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली होती. यावरूनही धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित क्षेत्राला मदत करतानाही बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस त्या निकषात बसत नसल्याचे सांगून जिल्ह्याला मदतीतुन वगळले होते. त्याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील नुकसान बघण्यासाठी प्रत्यक्ष येण्याचे आवाहन केले आहे, याची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार का? खरंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रति आत्मीयता दाखवून ओला दुष्काळ किंवा तत्सम विशेष मदतीची राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या