MB NEWS-पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा

 पीक नुकसानीचे पंचनामे करून विमा मंजूर करा-किसान सभा


परळी / प्रतिनिधी


सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिक विमा देण्यात यावा व अतिवृष्टीगस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.


दि 11 ऑक्टोबर पासून सातत्याने परळी तालुक्यातील विविध महसूल मंडळात अतिवृष्टी होत आहे. यामुळे काढणीस आलेले काढून ठेवलेले सोयाबीन, बाजरी, इत्यादी पिकांचे तसेच वेचणीस आलेल्या कापसाचे तसेच पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते आणखीही पाऊस असाच पडत पडणे सुरूच आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे काढणी अगोदर, काढणी समयी, वा काढणी पश्चात झालेल्या नुकसाना संदर्भातील तक्रारी 72 तासाच्या आत दाखल केलेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण व तक्रारींचे व्यापकप्रमाण पहाता पिकपंचनाम्यांच्या फेन्यांत वेळ काढू धोरण अवलंबता" च्या आधारे तातडीने अडचणीतल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करावे व शासनाकडूनही या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत द्यावी. महावेब पोर्टल वरील पावसाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असली तरी प्रत्यक्षात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कुठे कुठे तर दगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. याही वास्तव बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून अडचणीतल्या शेतकन्यांना तात्काळ पीक विमा व अतिवृष्टी मदतीचे वाटप करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने निवेदनाद्वारे किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.भगवान बडे,कॉ.बालाजी कडभाने,कॉ.ब्रम्हानंद देशमुख,कॉ.प्रवीण देशमुख,कॉ.परमेश्वर गित्ते,कॉ.विष्णू देशमुख, कॉ.संजय नवगरे आदींनी निवेदनाद्वारे परळी तहसिलदाराकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !