MB NEWS-कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट

 कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची विज्ञान सेंटरला भेट               


 

परळी वैजनाथ.....

      स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग अधिक सहजपणे, सोप्या पद्धतीने समजावेत, त्यातील संकल्पना, सिद्धांत लक्षात यावेत यासाठी डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विविध असे 100 च्या जवळपास प्रयोग करून पाहिले. 

शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळासह विज्ञान मंडळही असून या मंडळामार्फत आठवड्यात एकदा प्रयोग करून दाखवले जातात. शालेय मंत्रिमंडळामार्फत बचत बँकही चालू असून या बचतीतून जमा झालेल्या पैशातूनच ही सहल काढण्याची नियोजन करण्यात आले होते. 

न्यूटनची गुरुत्वाकर्षण शक्तीची संकल्पना, ऊर्जेची विविध रूपे, हवे संदर्भातील प्रयोग, पाण्याचा व हवेचा दाब, साधी व सोपी यंत्रे, शरीराची आंतररचना, आवाजासंदर्भातील प्रयोग, दोलक, झुलत्या मनोरा संदर्भातील संकल्पना, विजेच्या संदर्भातील विविध प्रयोग यासह अनेक वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेतले आणि स्वतः करून पाहिले. 

प्रत्येक घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न कसा करावा आणि आपल्या अवतीभवती असणाऱ्या, घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्या अनुकूल कसे करून घ्यावे किंवा आपण स्वतः त्याच्याशी कसे जुळवून घ्यावे, विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात किती आणि कसा उपयोग करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना केंद्राचे समन्वयक श्री विरभद्र देशमुख यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्येक प्रयोग समजावून सांगताना करून दिले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून व आपल्या खास शैलीतून सतत हसत खेळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना खूप आवडला. 

शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड आणि शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !