इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य.

 वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य 


परळी. वै.-.                       ‌     ‌       

         वाचन हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग असून खऱ्या अर्थाने चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे वाचन हे एकच माध्यम आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य यांनी केले.                      

      येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती भारतरत्न  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री आचार्य "वाचन संस्कृतीचे संवर्धन"  या विषयावर बोलत होते.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ. डी. व्ही. मेश्राम हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात बोलतांना श्री आचार्य यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी हे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. त्यावेळी ते म्हणाले की वाचन हे माणसाचे आयुष्य घडविते. वाचनामुळेच संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. तसेच ज्ञानाच्या कक्षादेखील रुंदावतात. महापुरुषांच्या चरित्रवाचनाने नवी ऊर्जा व उत्साह वाढतो.तर जगण्याला बळ मिळते. सकारात्मक दृष्टी वाढीला लागते व शाश्वत सुखाची अनुभूती होते. 

      वाचनाने भूतकाळातील संदर्भ मिळतात. वर्तमानातील निर्णय क्षमतांचा विकास होतो. तर भविष्यकाळातील वेध घेता येतो. आधुनिक बदलत्या परिस्थितीत युवक सद्ग्रंथ वाचतील, तर देश व माणुसकी वाचेल, अशी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची खात्री होती.  वाचन  प्रेरणा दिनी वाचनाचा संकल्प करून भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना आदरांजली द्यावी, असे मत व्यक्त केले. ‌                 याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी वाचनाचे महत्व विशद करताना म्हणाले की, वाचनाने  नवी ऊर्जा नवी नवचैतन्य लाभते आणि माणूस म्हणून चांगले आयुष्य जगता येते. विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी विद्यार्थी कु. चैताली  दहिभाते,कु. गिरीजा गोस्वामी,कु. पूजा नेमाने व राहुल औटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व "वाचाल तर वाचाल" असा संदेश दिला.  तसेच याप्रसंगी भरविण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला सर्व मान्यवरांनी भेट दिली व विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. डॉ. एस. ए. धांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. एम. जी. लांडगे यांनी केले तर आभार डॉ. बी. पी. गजभारे यांनी केले.  या कार्यक्रमास  प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट