MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी

 पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नांमुळे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराला मिळाला १ कोटी ८६ लाखाचा निधी




संरक्षक भिंतीसह मंदिरातील मूर्ती शिल्पांवर होणार रासायनिक प्रक्रिया

मंदिरासाठी मंत्री असतांनाही दिला होता ५ कोटीचा निधी


परळी वैजनाथ । दिनांक १४।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे धर्मापूरी येथील प्राचीन केदारेश्वर मंदिरातील मूर्तीशिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी  पर्यटन खात्याने १ कोटी ८६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

   तालुक्यातील धर्मापूरी येथे प्राचीन केदारेश्वर मंदिर आहे, या वास्तुची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने  पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असतांना पर्यटन खात्याकडून  मंदिराच्या पूनर्निर्माणासाठी ५ कोटीचा निधी दिला होता, त्यातून बरीचशी कामे देखील झाली. मंदिरात अनेक प्राचीन शिल्पं, मूर्त्या आहेत त्याचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आता पुन्हा एकदा पंकजाताईंनी पर्यटन विभागाला सांगून १ कोटी ८६ लाख ४८ हजार रूपये मंजूर करून दिले आहेत. यातून राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या मूर्ती शिल्पांवर रासायनिक प्रक्रिया करणे व संरक्षक भिंत बांधणे असे काम होणार आहे. या निधी खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. दरम्यान हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार