MB NEWS-परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

 परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान



कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यांचा उपक्रम            

 परळी वैजनाथ,दि.17( प्रतिनिधी ) कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन , दिल्ली व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.16आक्टोबर 2022 रोजी परळी तालुक्यातील अनेक गा्वांमध्ये कैंडल मार्च काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे दुष्परिणाम ,आरोग्यविषयक निर्माण होणा-या  समस्या आदी विषयांवर या जनजागृती रैलिच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यात आले.महिला,मुले, पुरुष आणि काही ठिकाणी वृध्द अशा सर्वांनी या अभियानात आपले योगदान दिले.परळी तालुक्यातील सरफराजपूर,करेवाडी ,वडखेल ,सेलू (स),परचुंडी, देशमुख टाकळी यासह दहा ते अकरा गावांमध्ये हे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
         सन२०११च्या जनगननेेनुसार  महाराष्ट्रात 11लाख 60 हजार 665 बालविवाह झाले आहेत.देशातील एकूण बालविवाहापैकी ते 10 टक्के होते.बालविवाहाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.एका सर्वेक्षणानुसार देशातील 20ते 24 वर्ष वयोगटातील23.3 टक्के महिला अशा आहेत, ज्यांचे बालविवाह झाले आहेत. बालविवाहा सारखी सामाजिक दुष्पृवृती संपुष्टात आणणे हा या बालविवामुक्त भारत अभियानाचा उद्देश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !