MB NEWS-परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास

 परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास     

      


      




 परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार मांडला असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले असून सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक बनली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशी मागणी होत असताना भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना व्यथीत करणारी परिस्थिती निर्माण झालेली असून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल असा विश्वास  व्यक्त केला आहे.

         भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था परतीच्या पावसाने व अतीवृष्टीने व्यथीत करणारी झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार निश्चित उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून 12 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीची एक प्रकारे भेटच दिली आहे त्याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत समाधानाची भावना व्यक्त केली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार