MB NEWS:दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

 दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन




– बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांची माहिती


अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विश्‍वास, विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

आर्थिक क्षेत्रात कार्य करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. या जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील 20 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 21 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक मोठे विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत. यावर्षी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त 10 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, कुत्तर विहिर, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित व्याख्यानमालेसाठी मंगळवार, दि.10 जानेवारी रोजी हास्य कलावंत शिबानी जोशी आणि अनिल हर्डीकर (मुंबई) यांचा ‘हास्यमुद्रा’ हा दोन तास खळखळून हासविण्याची हमी देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच बुधवार, दि.11 जानेवारी रोजी अरूण करमरकर (ठाणे-मुंबई) यांचे ‘सरदार पटेल : समर्थ नेता, सच्चा अनुयायी’ या विषयावर व्याख्यान होईल. तसेच बँकेच्या वतीने दि.11 जानेवारी रोजी सहकार भारती स्थापना दिवस साजरा करण्यात येईल. व्याख्यानमालेचा समारोप गुरूवार, दि.12 जानेवारी रोजी अरविंद व्यं.गोखले (पुणे) यांच्या ‘टिळक पर्व’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी येईल. अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला – 2023 चा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख, संचालिका मा.सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे), संचालक श्री.रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, इंजि.बिपीन क्षिरसागर, प्राचार्य किशन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी बँकेच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकाद्वारे केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?