पोस्ट्स

जून ३०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्रीअंतरराष्ट्रीय योग खेळात स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले

इमेज
  सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्री अंतरराष्ट्रीय योग खेळात स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले परळी प्रतिनिधी  अंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा 29 जून 2024 नेपाळची राजधानी काठमांडू येथील बोगन व्हिला हॉलमध्‌ये संपन्न झाली. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेतेपद सोमेंद्र शास्त्री यांना प्राप्त झाले.  पहिल्या स्पर्धेत रिदमिक योगा व दुसरच्या स्पर्धेन ट्रेडिशनल योगा होता. ज्यात विभिन्न वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. चि सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्री याने 20 ते 25 या वयोगटातील ट्रेडिशनल योगा आणि रिदमिक योगा दोन्हींत भाग घेतला होता. त्यांच्या नियमित आसन अभ्यास व सातत्य योगाभ्यासाने अंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेच्या स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले.  या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तरीही परळी येथील विद्या नगर भागातील रहिवासी प्रा. डॉ.वीरेन्द्र कुमार शास्त्री व प्रा.वीरश्री शास्त्री यांच्या सुपूत्राने सुवर्णपदक मिळवून फक्त बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र व भारत देशाचे गौरव वाढविला आहे- त्याच्या या यशाबद्दल सर्वांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार

इमेज
  भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार   शुक्रवारी सायंकाळी तेलगाव येथे घडला अपघात   धारूर, प्रतिनिधी....                 खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्या धडक दिल्याने झालेल्या अपघातात वारकरी जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.       सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी चालली होती.या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. ही दिंडी दि.३\७\२०२४ बुधवारी लाडनांद्रा येथुन निघाली होती.सदर दिंडी शुक्रवार दि.५रोजी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती.दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडुन भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जाग...

MB NEWS:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

इमेज
  जन्मस्थान आपेगावचा   संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या पाटोद्यात !  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा   पाटोदा /अमोल जोशी...          शुक्रवारी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पाटोद्यातून दिघोळ कडे प्रस्थान केल्यानंतर शनिवार 6 जुलै रोजी  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपेगाव   पाटोदा नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळा शहरात आल्यावर नगरपंचायत , पोलीस पाटील व  नागरिक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत शिवाजी चौक येथे  करण्यात येते यावेळी बँड पथक, ढोली बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून बाजार तळ भामेश्र्वर मंदिर मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल. या ठिकाणी सर्व वारकरी भाविक भक्ताची जेवण व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा प्रदीप सरवदे यांच्या वतीने भोजन व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत जोशी व अश्रूबा जाधव यांच्या वतीने नाश्ता व चहापाणी व्यवस्था केली आहे तसेच मुळे वस्ती व बिनवडे वस्ती येथेही चहा नाश्ता होणार आहे.  संत श...

एक लाख किलोमीटर सायकल चालवली .....!

इमेज
  परभणी ते पंढरपूर सायकलवारीचे परळीत स्वागत एक लाख किलोमीटर सायकल चालवणे पुर्ण केल्याबद्दल शंकर फुटके यांचा सत्कार परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी)            परभणी येथील १५ सायकलस्वारांनी परभणी ते पंढरपूर सायकल वारी काढली असून दोन दिवसात अंदाजे ३५० किलोमीटर अंतर कापणार आहेत. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रमंडळीच्या वतीने स्वागत करण्यात आले.           परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवणे सुरू केले आहे. हळूहळू यामध्ये जवळपास २०० ते २५० जण ज्यात विविध क्षेत्रातील आरोग्याची काळजी घेणारे सहभागी झाले. यातून सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली. सध्या हे सर्व सायकलस्वार रोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवतात, यातूनच पंढरपूर वारीची संकल्पना सुचली. यामध्ये काही डॉक्टर व युवक सहभागी झाले. शुक्रवारी (ता.०५) पहाटे ५ वाजता परभणी येथून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरवर कळंब येथे मुक्काम तर दुसरा मुक्काम थेट पंढरपूर मध्ये असणार आहे. तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथ...

पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन

इमेज
विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन परळी आगाराकडून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीना मोफत पास वाटप परळी वैजनाथ दि.२ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांनी मोफत पास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख संतोष महाजन यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या वतीने अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेतंर्गत विद्यार्थींनींना लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पासचे वाटप आगारप्रमुख संतोष महाजन व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.व महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.       परळी आगाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयात विविध पास व सवलतीचा जागर केला जात आहे. येथील आगर प्रमुख संतोष नागनाथ महाजन यांच्यासह आगारातील कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शालेय पास व सवलतीच्या लाभाविषयी माहिती देत आहेत तसेच नियमित विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवास पास योजनेतून विद्यार्थिनींना मोफत पास मुलांच्या हा...

कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे

इमेज
  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून परळीतील 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे वाटप कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....          बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने (लालबावटा) नोंदी केलेल्या 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे (भांडे) मंडळाकडून बीड येथे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षा(पेटी) व गृहउपयोगी संच(भांडे) मोफत वाटप केली जातात. यापूर्वी पेट्या व गृहउपयोगी संच तालुक्याच्या ठिकाणी किवा कामगारांच्या राहत्या गांवात आणून दिले जात होते. परंतू कामगारांची फार लूट होत आहे म्हणून मंडळाने जिल्हा ठिकाणीच पेट्या व भांडे कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे असे अधिकाऱ्यांकडून बोलते जाते.           गृहउपयोगी संच आणणे प्रत्येक कामगाराम अत्यंत त्रासदायक आहे.संच वाटप केंद्र बीडपासून आठ किलोमीटर दूर आहे व रिक्षा किमान 500 रु. घेतो. जिल्हयातील बांधकाम कामगारांना संच मिळण्यासाठी तालुक्याप्रमाणे...

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट

इमेज
पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट मुंबई(प्रतिनिधी)  भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातल्या हितचिंतक तथा अठरापगड जातीधर्माच्या सामान्य लोकांना कमालीचा आनंद वाटला. मात्र विधान परिषद हे आमच्या नेतृत्वासाठी मिळालेली संधी आनंदाची गोष्ट असली तरी  यापेक्षा मोठं होवुन संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशा प्रकारची भावना परळीतुन आलेले कडवे समर्थक नरसिंग सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.        पंकजा मुंडे यांच्या वरळी स्थित निवासस्थानी तीन दिवसापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन भेटण्यास येणार्‍याच्या गर्दीत तुफान वाढ झाली.मागच्या पाच वर्षापासुन राजकिय प्रतिष्ठा मिळण्याची सामान्य लोक वाट पहात होते.पक्षानं विधान परिषद उमेदवारी पहिल्या क्रमांकात त्यांना दिली. कदाचित भविष्यात मोठी राजकिय जबाबदारी देखील त्यांच्यावर येवु शकते यात तिळमात्र शंका नाही. नरसिंग सिरसाट ज्यांना सावकार म्हणुन परळीत ओळखल्या जातं. पंकजाताईचे कडवे समर्थक असंही म्हणत...

परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !

इमेज
परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !  परळी (प्रतिनिधी)         परळी शहरातील बँक कॉलनी भागात शनिवार दि.29 जुन रोजी रात्री घडलेल्या गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असुन मरळवाडीचे सरपंच बापुराव आंधळे यांच्या मृत्युनंतर या घटनेत पहिल्या दाखल गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव असलेल्या व जखमी झालेल्या महादेव गित्ते यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शनिवार दि.29 जुन रोजी परळी शहरातील बँक कॉलनी येथे रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर याप्रकरणी गोट्या उर्फ ग्यानबा गित्ते याच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेत जखमी असलेल्या महादेव उध्दव गित्ते रा.नंदागौळ,ह.मु.बँक कॉलनी परळी यांच्या फिर्यादीवरून आता या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, जखमी असलेल्या महादेव उध्दव गित्तेंवर अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात उपचार सुरु होते. महादेव गित्ते यांच्या फिर्यादीवरुन बुधवार दि.03 जुलै रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात  बापु आंधळे (मयत...

वैद्यनाथ साखर कारखान्याचे भंगार चोरी करताना चौघांना पकडले

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याचे भंगार चोरी करताना चौघांना पकडले परळी (प्रतिनिधी)  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअरमधील सामान चोरुन घेवुन जात असताना सुरक्षा रक्षकांनी सापळा रचत चौघांना घेरले यापैकी दोघे पळुन जाण्यात यशस्वी झाले तर दोघांना पकडुन कारखान्याचे संचालक माऊली मुंडे यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी या चोरांना ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि.पांगरी हा दोन वर्षांपासुन बंद असुन कारखान्याच्या मशिन व सामानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.बालाजी दत्तराव मुंडे मंगळवार दि.2 जुन रोजी सकाळी 9 वाजता कामावर गेले असता त्यांना पाळी जमादार भास्कर सिद्राम मुंडे यांनी फोन करत स्टोअरमधील सामान पडले असल्याचे सांगितले.हा प्रकार चोरीसाठी असल्याचे लक्षात येताच सुरक्षा गार्ड राम नागोराव पाचुंदे,रामचंद्र भिमाबुवा भारती,शिवाजी शंकर मुंडे यांना सोबत घेवुन सापळा रचत चोरावर नजर ठेवली असता एम.एच.44 एए 0768 या क्रमांकाच्या स्कुटीवर दोघे व झाडीतुन दोघे असे चार जण पिन बार,मोटरी ...

पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले

इमेज
दोन दिवसाखालीच खून झालाय... चौकशी करायचीय थांबा म्हणत परळीजवळ वाटमारी ! पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी जवळच्या चांदापूर या गावाकडे जाणाऱ्या डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी येथील एका पती-पत्नीला आम्ही पोलिस आहोत असे म्हणून रस्त्यात थांबवले आणि आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्यांना तीन लाख रुपयाला लूटल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या तोतया पोलिसांनी या पती- पत्नीला भिती घालत दोन दिवसा खालीच इकडे खून झाला आहे. तुमची चौकशी करायची आहे असा संदर्भ देत या पती पत्नीला चांगलाच दम दिल्याचेही पुढे आले आहे.           या खळबळजनक व नागरिकांमध्ये पोलिसांच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, सुरेश केरबा मुंडे वय 70 वर्षे रा.डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी हे लुना गाडीवर परळी जवळील चांदापूर येथील त्यांचे व्याही माधवराव आर्जुन गित्ते रा. चांदापुर यांना हात ऊसणे देण्यासाठी म्हणून एका बॅगमधून  तीन लाख रुपये घेऊन निघाले. त्यांच्यासोबत लूनावर त्यांची...

पीएम किसान संदर्भातील लक्षवेधीला मुंडेंचे उत्तर

इमेज
कृषी विभागाच्या प्रयत्नातून एक वर्षात पीएम किसान योजनेत राज्यात 20 लाख 50 हजार लाभार्थींची वाढ - धनंजय मुंडे पीएम किसान संदर्भातील लक्षवेधीला मुंडेंचे उत्तर - 65 हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर, मान्यतेसाठी पाठपुरावा करणार - धनंजय मुंडेंचे उत्तर आ.अभिमन्यू पवारांसह विविध सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून  केली होती मागणी डेटा एन्ट्री साठी स्वतंत्र लॅपटॉप देणार - मुंडेंची घोषणा मुंबई (दि. 02) - केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत 70 लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये 20 लाख 50 हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  पी एम किसान योजनेत राज्यातील 65 हजार शेतकर...

हत्या झाली, रोहित पवार मात्र राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप

इमेज
बापू आंधळे हत्या प्रकरणी वक्तव्य:आ.रोहित पवारांच्या निषेधार्थ रा.काॅ.कडून उद्या परळी बंदची हाक परळी वैद्यनाथ (दि. 02) - 29 जून रोजी परळी वैद्यनाथ शहरात धनंजय मुंडे समर्थक मरळवडीचे सरपंच असलेले बापूराव आंधळे यांची डोक्यात गोळ्या झाडून  हत्या करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण गोळीबारात जखमी आहे. या प्रकरणात पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला असून ते तपास करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  आमदार रोहित पवार यांना स्वतःची व आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे व त्याच्या कुटुंबविषयी सहनुभीती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत आहेत.धनंजय मुंडे यांची व परळीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांचे हे वर्तन अत्यंत असंवेदनशील व निषेधार्ह असून बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.          एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणखी एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याबद्दल कोणतीही संवेदनशीलता न दाखवता केवळ राजकारण मध्ये आणून आरोपीचे समर्थन करायचे इतक...

पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार

इमेज
  मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते :पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना   पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार मुंबई।दिनांक ०२। “मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते” अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दाखल करतेवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.    पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते. मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभरदेखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. मग मी अर्ज दाखल करेन.” मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा

इमेज
  विधानपरिषद निवडणूक; पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा पंकजाताईंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची वरळी ऑफिसला तोबा गर्दी 'पंकजाताई आगे बढो', 'मुंडे साहेब अमर रहे' च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला मुंबई।दिनांक ०२।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच आमदारांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. पंकजाताईंची उमेदवारी दाखल करतेवेळी  विधानभवन परिसरात तसेच वरळीच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.     विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होत असून आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपने पंकजाताईंसह आपल्या पाच उमेदवारांची घोषणा काल केली होती. आज सकाळी ११ वा. पंकजाताईंनी विधानभवनात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सकाळी त्...

गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव

इमेज
  पंकजा मुंडे विधानपरिषदेवर ; परळीसह जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव परळी वैजनाथ।दिनांक०१।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच परळीसह संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला. Click :- ● *अखेर भाजपने पंकजाताईंना विधानपरिषद दिली !*     विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली, यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजाताई  मुंडे यांचे नाव जाहीर होताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पंकजाताईंच्या यशःश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलाल उधळून एकच जल्लोष केला. जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई आदींसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.  ••••

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त

इमेज
  विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने हे विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.सोमवार दि 1 रोजी त्याच्या सेवापूर्ती गौरव सोहळा महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित परळी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने 28 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.सेवापूर्ती निमित्ताने सोमवार दि 1 रोजी त्याचा गौरव सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.या प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,केंद्र प्रमुख विश्वंभर चेनलवाड, माजी मुख्याध्यापक भगवान बडे, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, मुख्याध्यापक सुरेश बुरांडे आदी सह राजमाने परिवारांचे स्नेही,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !

इमेज
  अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !        मराठवाड्यात बसलेल्या राजकीय पराभवावर मार्ग काढण्याच्या हालचाली आता भाजपकडून सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या जागेसाठी पंकजा मुंडेंनाही संधी देण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष ऑक्टोबर महिन्यात घोषित होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू होती. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचा भाजपच्या यादीत  समावेश आहे.         भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा सुरू होती ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपकडून प्रयत...

पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

इमेज
  नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली - धनंजय मुंडे नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्हयाने ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला - पंकजा मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली बीड।दिनांक ०१। दैनिक चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या दुःखद निधनाने पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांनी दैनिकाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम तर केलेच याशिवाय बीडला रेल्वे आणण्यातही त्यांचे योगदान महत्वाचे होते. संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ देखील त्यांनी उभी केली.बीड जिल्हा व मराठवाड्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला. केवळ ...

Photos.....विहंगम दृष्य :संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी...

इमेज
 ● विहंगम दृष्य : शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा काल परळीत दाखल झाला.आज शक्तीकुंज वसाहत येथून परळी वैजनाथ येथे मार्गक्रमण करतांना परळीतील डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर असतांना टिपलेले हे विहंगम दृष्य.  ( छायाचित्रे: सुनील फुलारी, प्रेस फोटोग्राफर परळी वैजनाथ .) संतश्रेष्ठ गजानन  महाराजांच्या पालखीचे वैद्यनाथनगरीत जोरदार स्वागत पण नगरप्रदक्षिणेची परंपरा यावर्षीही खंडीत ! दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; हरिनामाच्या गजराने परळी दुमदुमली परळी वैजनाथ /एमबी न्यूज वृत्तसेवा        भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत आज (दि.1) आगमन झाले आहे. आज सकाळी हा पालखी सोहळा  औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीतून परळी शहराच्या दिशेने रवाना झाला. श्रींच्या पालखीचे परळीच्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले.      आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या पाल...

जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन

इमेज
  जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     परळीतील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय व सर्व क्षेत्रात जनसंपर्क असलेले सर्व परिचित असे व्यक्तिमत्व प्रकाशसिंह (भैय्या) ठाकूर यांचे वयोमानाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.       प्रकाशसिंह हनुसिंह (शेंगर) ठाकूर हे परळी शहरातील सर्व परिचित असे व्यक्तिमत्त्व होते. ठाकूर स्टाईल राहणीमान व पेहरावाने त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. प्रत्येकाशी अतिशय आत्मीयतेने व अधिकाराने बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशसिंह ठाकुर होते. परळी नगर परिषदेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. परळी शहरातील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे प्रकाशसिंह ठाकूर हे जनसंघातही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

इमेज
  परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात  परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा-           परळी तालुक्यातील मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात  पोलीस वेगाने तपास करीत असुन जलद तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.या अनुषंगानेच आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.            परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खूनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. या आरोपीना ...

जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांचे निधन!

इमेज
  जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर  यांचे निधन! बीड -दैनिक चंपावतीपत्र   चे संपादक नामदेवराव क्षीरसागर उपाख्य दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते. गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ मजबूत केली. नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता

इमेज
  नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता   .............. नांदेड दिनांक 30 जून प्रतिनिधी  नांदेड येथील महात्मा गांधी मिशन संचलित एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभियांत्रिकी विद्याशाखेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा समजल्या जाणाऱ्या  आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व ऑटोमेशन रोबोटिक या दोन विद्याशाखांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेला मान्यता दिली आहे. अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांनी दिली आहे.         1984 मध्ये महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी नांदेड जिल्ह्यातील युवकांसाठी अभियांत्रिकी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रारंभ केला होता. अभियांत्रिकी पदवी विद्याशाखेचे पाच अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चार अभ्यासक्रम तसेच संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर) आजमितीस या अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या शैक्षण...