परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

 परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात 


परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा-

          परळी तालुक्यातील मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात  पोलीस वेगाने तपास करीत असुन जलद तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.या अनुषंगानेच आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.

           परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खूनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. या आरोपीना फरार करण्यासाठी मदत केलेल्या चौघांना केज आणि धारूर पोलिसांनी अटक केली असुन हे आरोपी परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

    परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार आंधळे यांच्या खून प्रकरणात ग्यानबा उर्फ गोटया मारोती गित्तेच्या तक्रारीवरून बबन गित्तेसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक विषयाच्या वादातून ही घटना घडली होती.बीड जिल्ह्यात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असुन पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी मोहीम गतिमान केली आहे. मुख्य आरोपी व इतर आरोपीना फरार होण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध करून देणे तसेच इतर मदत केल्याप्रकरणी  आसाराम दत्ता गव्हाणे (वय-२३),मयूर सुरेश कदम (वय-२९),रजतकुमार राजेसाहेब जेधे (वय-२७),अनिल बालाजी सोनटक्के (वय-२३)या चौघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आरोपी अद्याप फरार असून पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व पोलिसांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !