धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:गोवा येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने संपादक बालासाहेब फड सन्मानित

 गोवा येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2023 ने संपादक बालासाहेब फड सन्मानित




परळी, (प्रतिनिधी):- इंटरनॅशनल ह्यूमन राईट आणि क्राईम कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने अद्भुत भारत, संपन्न भारत, आत्मनिर्भर भारत आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवार्ड  2023 ने दैनिक सोमेश्वर साथीचे मुख्य संपादक बालासाहेब फड यांना गोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. संपादक बालासाहेब फड यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी गोवा येथे  इंटरनॅशनल हॉटेल पार्क रेगिस्ट येथे इंटरनॅशनल ह्यूमन राईट क्राईम कौन्सिलचे मुख्य डॉ व्ही.पी सिंग व आकांक्षा विद्यार्थी, डॉ हरीश मखीजा यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय राष्ट्र गौरव अवॉर्ड ने बालासाहेब फड यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल  सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच या अगोदरही संपादक बालासाहेब फड यांना नाशिक येथे झालेल्या वंजारी समाज साहित्य संमेलनात मानाचा  ग्रामीण साहित्यिका कै.  सुंदराबाई आंधळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?