MB NEWS:गो मतेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण- साध्वी श्रेया भारतीजी.

 गो मतेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण- साध्वी श्रेया भारतीजी.




अंबाजोगाई/लातुर _

गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जागृति संस्थानच्या वतीने ५ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या पाठीमागील ग्राउंड मध्ये सात दिवसीय भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या तिसऱ्या दिवशी, श्री आशुतोष महाराज जींच्या शिष्या श्रेया भारती यांनी सीता स्वयंवराच्या संदर्भात सांगितले की, भगवान श्री रामजी दैवी लीला करत असताना गुरुकुलातून शिक्षण घेऊन अयोध्येला कसे परतले. त्यानंतर विश्वामित्रजी भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांची राजा दशरथ यांच्याकडे मागणी करतात. श्री राम त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी तयार करताना वाटेत ताडकासुर चा वध करतात. पुढे जात असताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्येचा उद्धार करून यज्ञाचे रक्षण करतात. त्यानंतर ते गुरु विश्वामित्रांसहित जनकपुरीत प्रवेश करतात आणि भगवान शिवाचे धनुष्य तोडून जानकीशी लग्न करतात. लग्नसोहळ्यात माता गोदान करतात. साध्वीजी म्हणाल्या की गाय ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे आणि समाजाचा कणा आहे तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. गो मातेचे रक्षण हे भारताचे रक्षण आहे, गो मातेचे रक्षण हेच संस्कृतीचे रक्षण आहे, त्यामुळे जागे व्हा आणि आपली संस्कृती आणि संस्कार जाणून आपल्या गो मातेचे रक्षण करा, जी आपल्या कृषी व्यवस्थेचा आधार व दाता आहे. पर्यावरणाचा समाजाचा आधार आहे. तिचे रक्षण करा, जागा भारतीयांनो, संस्कृतीकडे वाटचाल करा. तिसऱ्या दिवशी च्या कथेसाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अजित  पाटील, श्री. रविशंकर जाधव, श्री.रवी सुडे, श्री.पाटील साहेब पोलीस निरीक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन लातूर, अभयजी साळुंके, नारायण मुंडे , व्यंकट मुंडे, लक्ष्मीकांत शेटजी, श्रीनिवास येलागट्टे,नंदकिशोर मल्लुरावर,श्री रणखांब साहेब,नेताजी देशमुख,अभिनंदन जाधव,प्रमोद गुडे, आनंद ढवळे, अनिरुद्ध राजूरकर इत्यादी प्रमुख अतिथी उपस्थित होते. नारायण मुंडे , व्यंकट मुंडे आणि लक्ष्मीकांत शेटजी यांच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला ,शेवटी पावन पुनीत आरतीने श्रीराम केथेच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?