धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम शैक्षणिक सहल

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम शैक्षणिक सहल 



परळी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम ता परळी ची शैक्षणिक एक दिवसीय परिसर भेट व शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.

सहली दरम्यान गोपीनाथ गड पांगरी,श्री कंकालेश्वर मंदिर बीड,बीड शहराजवळच साधारण १६२५ ते ३० या काळात बांधली गेलेली भव्य जलवास्तू आहे. शहरापासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर खजाना विहिर आहे. या विहिरीचा व्यास सुमारे ५० फूट आहे, तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडाही असून त्यावर सहज फिरता येते. याही ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यात आली , श्री क्षेत्र कपिलधार मन्मथस्वामी समाधी व भव्य डोंगराच्या रांगा याचेही दर्शन झाले,श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री नंदकिशोर विभूते यांनी  दुपारी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली,तसेच  श्री क्षेत्र चाकरवाडी व योगेश्वरी देवी अंबाजोगाई दर्शन घेऊन सहल संपन्न झाली.

      सहलीच्या यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक अशोक नावंदे सर ,शा.व्य. समिती अध्यक्ष  श्री नवनाथराव नागरगोजे,शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर,सचिन फड सर,श्रीम बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?