MB NEWS:बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा पकडला

  बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा पकडला


बीड : येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी ( दि. १० ) पहाटे मोठी कारवाई करत बेकायदेशीर गावठी कट्टा ( पिस्तुल ) बाळगणाऱ्या पर जिल्ह्यातील तरुणाला मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई बीड-गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी जवळ केली.

मंगळवारी ( दि. १० ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गुप्त खबऱ्या मार्फत एलसीबी ला माहिती मिळाली की, बीड-गेवराई रस्त्यावर पाडळसिंगी जवळील उड्डाण पूलाखाली एक तरुण संशयास्पद पने थांबलेला असून त्याच्या कमरेला पिस्तुल आहे. माहिती मिळताच LCB अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा उड्डाण पूलाखाली एक तरुण उभा होता. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसत होत्या. जवळ जाऊन त्यास नाव गाव विचारताचा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यास मोठ्या शिताफीने पकडले. त्याच्याजवळ गावठी पिस्तूल किंमत ३७ हजार मिळून आले. त्यास नाव गाव विचारले असता त्याने जुबेर शफीक आतार ( वय २७ वर्ष ) रा. जयभवानी चौक पाथर्डी ( ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) असे सांगितले. आरोपीस गेवराई पोलीसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ( LCB ) ने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?