MB NEWS:अंबाजोगाईच्या खेळाडूंची चांगली कामगिरी

 अंबाजोगाईच्या खेळाडूंची चांगली कामगिरी

नेपाळ येथील पोखरा येथे दि.3 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या इंडो नेपाळ टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट टूर्नामेंट 2023 मध्ये अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत काठमांडू, पोखरा,डेहराडून, हरिद्वार या संघासोबत उत्तम खेळ करून अंबाजोगाईच्या खेळाडूंनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत अंबाजोगाईच्या आर्यन वाकडे या खेळाडूने सामन्यात कर्णधारला शोभेल अशी 60 धावांची भक्कम खेळी केली तसेच या स्पर्धेत आर्यन चव्हाण या फक्त 10 वर्षीय गोलंदाजाने 6 खेळाडूंना बाद केले.

अंबाजोगाईच्या खेळाडूंचे स्पर्धेतील उत्तम नियोजन, सर्व खेळाडूंचा उत्तम खेळ व शिस्त या जोरावर या संघाने द्वितीय पारितोषिक पटकवले. अतिशय रम्य अश्या नेपाळ येथील हिमालय पर्वतःच्या सानिध्यात या स्पर्धा आज पार पडल्या. नेपाळमध्ये स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांची, आयोजकांची मने या संघाच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने जिंकली. या स्पर्धेत सहभागी खेळाडू कर्णधार आर्यन वाकडे, शोर्य लोमटे, अद्विक पाटील, रुद्र हजारी, अथर्व राजेमाने, अमन पठाण, निलेश रोकडे, चैतन्य तांदळे, युवराज जाधव, संकल्प जड, आर्यन चव्हाण, प्रसाद सोनवणे, यश भरती, प्रवीण मुंडे, रुपेश जाधव, यश मुंडे तसेच प्रशिक्षक मोहित परमार, स्वप्नील कोकाटे तसेच पालक प्रतिनिधी म्हणून शिशिर व सौ. शुभांगी राजेमाने हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी  प्रदीप ठोंबरे,अमित जगतकर,राजेंद्र कांबळे तसेच माजी जि. प. अध्यक्ष मा. रमेशजी आडसकर यांनी खेळाडूंना सहकार्य केले. तर आनंदजी कर्नावट, संतोष कदम,अविनाश साठे, शुभम लखेरा,हरीश रुपडा, डॉ. असद जानूला,राजेंद्र देशपांडे, विनोद गंगणे,ज्ञानेश मातेकर सर,माही परमार यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?