धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:परळी तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार

 परळी तालुका व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष पदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष पदी महादेव गित्ते तर उपाध्यक्ष पदी श्रीराम लांडगेंची निवड झाल्याबद्दल या पदाधिकाऱ्यांचा  परळीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुस्तके भेट देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   

             राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्षपदी महादेव गित्ते, उपाध्यक्षपदी श्रीराम लांडगे व व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्षप महादेव गित्ते, उपाध्यक्षप श्रीराम लांडगे त्यांच्या नियुक्ती बद्दल परळीत संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव,  संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज,संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष राजू भूतके संदीप रोडे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?