धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलन

 प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलन




आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-किसान सभा


परळी / प्रतिनिधी


संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी प्रश्नावर पुन्हा एकदा देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.या देशव्यापी आंदोलनात बीड जिल्हा किसान सभा सहभागी असून या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात किसान सभेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती बीड जिल्हा किसान सभेने दिली आहे.


दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा या देश पातळीवरील मागण्यांसाठी 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी हरियाणामध्ये भव्य किसान महापंचायत आयोजित करून या आंदोलनाची सुरुवात होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात वरील देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील ताफवती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या मागण्यांसाठी या संयुक्त किसान मोर्च्यांने यासारखे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी ११:३० वा. आंदोलन करण्याचा निर्णय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाने घेतला असून या आंदोलनात परळी तालुका किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेऊन परळी तहसील  कार्यालयांवर ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करणार असल्याची माहिती काॅ. भगवान बडे तालुका अध्यक्ष किसान सभा परळी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?