MB NEWS:भिमवाडी येथील बौध्द विवाहाराचे काम आठ वर्षांपासुन रखडले

 भिमवाडी येथील बौध्द विवाहाराचे काम आठ वर्षांपासुन रखडले

26 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या करणार-राहुल घोबाळे

परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील भिमवाडी भागात नगरपालिकेकडुन सामाजिक न्याय व कल्याण विभागा अंतर्गत आमदार फंडातून गत आठ वर्षांपासुन सुरु असलेले बौध्द विहाराचे काम अपुर्णच आहे.याबाबत अनेकवेळा मागणी,आंदोलन करुनही काम पुर्ण झालेले नसल्याने येत्या 20 जानेवारी पर्यंत काम पुर्ण करुन लोकार्पण करावे व संबंधित गुत्तेदारावर ॲट्रासिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी रोजी नगरपालिकेच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या करणार असल्याचा इशारा भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल घोबाळे यांनी दिला आहे.

याबाबत परळी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. आपल्या नगर परिषदे तर्फे सामाजिक न्याय व कल्याण विभागा अंतर्गत आमदार फंडातून भिमवाडी येथे बौध्द विहार बांधकाम करणे व अडथळा येत असलेले घरे उठवून त्यांना नविन घर बांधून देणे ८ वर्षापूर्वी जुने विहार पाडून नविन बौध्द विहार बांधण्याचा आराखडा व नकाशा तयार केला.सदर बौध्द विहाराचे भुमीपुजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले होते व त्यांनी सदर बौध्द विहार लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण ८ वर्ष झाले तरी पण बौध्द विहाराचे काम पूर्ण झालेले नाही व केलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. बौध्दविहार वरील घुमटचा आकार मस्जीदसारखा दिसत आहे तो बौध्दस्तुपासारखा करावा. वरचेवर नकाशे बदलत गेले व एक १०० किंवा १५० मानसे प्रार्थणा करण्या एवढे सभागृह बांधले. सभागृह हे ५०० ते १००० लोक प्रार्थनेसाठी बसण्यासाठी व ध्यान साधनेसाठी बौध्द विहार असते.  अनाडी माणसांच्या अनाडी कल्पनेनुसार ८ वर्षात विहार तर नाही पण सभागृह पण बरोबर नाही.अर्ज करून व उपोषण करून थकलो आहोत.  आश्वासन ऐकून मी हताष झालो आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

     २० जानेवारी २०२३ पर्यंत बौध्द विहाराचे लोकार्पन करावे किंवा संबंधीत अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर ऍट्रॉसीटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या नवीन वर्षात २६ जानेवारी २०२३ रोजी आपल्या बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल घोबाळे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री,जिल्हाधिकारी साहेब, बीड,तहसीलदार,तहसील कार्यालय, परळी,पोलीस निरीक्षक शहर पो.स्टे.परळी यांना दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?