धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS: संपादक सतिश बियाणी यांना वार्ता भूषण पुरस्कार जाहीर

  संपादक सतिश बियाणी यांना वार्ता भूषण पुरस्कार जाहीर



परळी / प्रतिनिधी- संपादक सतिश बियाणी, हे गेल्या अनेक वर्षापासून, दै.मराठवाडा साथीच्या माध्यमातून, अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित करुन, त्यामाध्यमातून, समाज प्रबोधन करीत असतात,त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित ६ वे मराठी साहित्य संमेलनाच्या  निमित्ताने, 'वार्ता भूषण' पुरस्कार सतिश बियाणी यांना जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार ६ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाथरा, येथे ४जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता वितरित करण्यात येणार आहे. श्रीनाथ मानव सेवा मंडळ  यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे अध्यक्ष दगडू लोमटे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब   आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

 या पुरस्कारात परळीतील दै. मराठवाडा साथीचे  संपादक सतिश बियाणी यांची निवड वार्ता भूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नुकतीच याबाबतची घोषणा श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे यांनी केली आहे. या निमित्ताने जनमानसात सामाजिक विचारवंत ठरलेल्या सतिश बियाणी यांचा सन्मान होणार आहे. या पुरस्काराबद्दल  संपादक पत्रकार सतिश बियाणी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?