MB NEWS: पहा:मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची तयारी पूर्ण : परळी तालुक्यात तीन बुथ


सर्व मतदान पथके साहित्यासह मतदान केंद्रस्थळी


         परळी वैजनाथ:- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथके  साहित्यासह मतदान केंद्रावर पोहचली आहेत. निवडणुकीसाठी  पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.परळी तालुक्यात मतदानासाठी तीन बुथ आहेत. 


      औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान उद्या 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक कोणत्याही प्रकारची वस्तु घेऊन जाता येणार नाही. मतदान केंद्रावर अखंडीतपणे व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने विभागातील सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      शिक्षक मतदार संघासाठी परळी तालुक्यात जवळपास 900 च्या वर मतदान आहे. या दृष्टीने मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे परळी तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे परळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतदान केंद्र असणार आहे तर तालुक्यात शिरसाळा व धर्मपुरी येथे शिक्षक मतदार संघासाठी चे मतदान केंद्र राहणार आहे.


मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना


1.      मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन यांचा वापर करू नये.


2.      ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात "१" हा अंक नमूद करून मतदान करावे.


3.      उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम २, ३, ४ इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम" (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.


4.    कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करू नये.


5.     पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. १,२,३, इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.


6.      अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III, इत्यादी किंवा संविधानाच्या ८ व्या अनुसुचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.


7.     मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये.


8.     तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर (v) किंवा (X) अशी खुण करू


नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल.


9.      तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर "१" हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत.


 


मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य


                  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे. या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.


हे पुरावे असणार ग्राह्य


                  1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या  मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.


                  मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या मताची सरमिसळ करुन मतमोजणी होणार असल्याने मतदाराचे मत गोपनीय राहणार आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?