MB NEWS:दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांना पितृशोक; वामनराव दुंदुले यांचे निधन

 दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांना पितृशोक; वामनराव दुंदुले यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

       येथील स्नेहनगर मधील रहिवाशी व आरोग्य विभागातील सेवानिवृत्त तंत्रज्ञ वामनराव दुंदुले यांचे आज दि.9 रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्तात्रय उर्फ पिंटू दुंदुले यांचे ते वडील होत.


     वामनराव दुंदुले हे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. सुस्वभावी, संयमी म्हणून ते परिचित होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान आज दि. 9 रोजी सायंकाळी साडेपाच वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दुंदुले परिवाराचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या निधनाने दुंदुले कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात...........परिवार सहभागी आहे.


 उद्या अंत्यसंस्कार

       दरम्यान वामनराव दुंदुले यांच्या पार्थिवावर उद्या दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. स्नेहनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?