धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण

 शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी - अभयकुमार ठक्कर



स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण, भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन व नवीन फलकाचे अनावरण


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*

शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. मा बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी अशी समाज सेवा केली तरच खर्‍या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली असे होईल असे प्रतिपादन श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा परळीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर यांनी केले. दरम्यान आज सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण व नवीन फलक व भगव्या ध्वजाचे  अनावरण  अभय कुमार ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार दि. 23 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे सकाळी 11 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, जेष्ठ नेते नारायण सातपुते,  युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे ,शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतीश जगताप , माजी शहर संघटक संजय कुकडे, संपादक राजेश साबणे, पत्रकार संतोष जुजगर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख अभयकुमार पप्पू ठक्कर बोलत होते. पुढे ते म्हणाले की,  शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरेंनी मुळातच गोरगरिबांची सर्वसामान्यांची समाजसेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे ह्याच कार्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि तमाम शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा संदेश दिला आणी ह्या संदेशाच्या आधारावरच महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या पक्षाचे वटवृक्ष झाले आणि शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेनेच आमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले. तेव्हा शिवसैनिकांनी आपणा  स्वतःस समाजकार्यात वाहून घेत गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची सेवा करून त्यांच्या आडी अडचणीत मदत करावी जेणेकरून शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचा खर्‍या अर्थाने शिवसेना पक्ष स्थापण्याचा उद्देश सफल होईल व शिवसेना पक्षप्रमुख  मा.उद्धव ठाकरे साहेबांचेही हात बळकट होतील असेही उपजिल्हाप्रमुख अभयकुमार  पप्पू ठक्कर म्हणाले.

यावेळी जय भवानी, जय शिवाजी, अमर रहे, अमर रहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे,  तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय, आवाज कुणाचा शिवसेनेचा, आ...ब.. बं काय झाली गोष्ट जय महाराष्ट्र अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर,सोमनाथ गायकवाड,पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर,आकाश जाधव, जगदीश पवार,विकास देवकर, सुधाकर बारसकार यांनी प्रयत्न केले.

          ● Video ●



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?