MB NEWS:परळी :रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पुर्ण; नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 परळी :रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम पुर्ण; नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन






परळी ते लातुर रोड या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पुर्ण असून या विद्युत पोल मध्ये 25000 wt विद्युत प्रवाह चालू असून जनतेनी, पशुपालकांनी विद्युत पोल जवळ किंवा स्पर्श न करण्याचे आवाहन मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे पी.डी. मिश्रा यांनी केले आहे.

           दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शेवटचे परंतु उत्पन्नाच्या बाबतीत परळी जंक्शन आघाडीवर असुन परळी ते लातुररोड हे 63.75 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असुन मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, श्री पी.डी. मिश्रा यांनी 28.01.2023 रोजी नवीन विद्युतीकरण केलेल्या लातूर रोड - परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभागाची पाहणी केली आहे.
 
      रेल्वे विभागाचा प्रति किलोमीटर 5 लिटर हा डिझेलवर होणारा खर्च विद्युतीकरणामुळे निम्म्यावर येणार आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी हे एक ज्योतिलिंग असुन या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असल्याने सिकंदराबाद झोन मधील परळी हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक शहरात येत असल्याने भविष्यात हे स्थानक मध्यवर्ती स्थानक म्हणुन नावारूपास येणार आहे. परळी वि बाद या 267 किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणास केंद्र सरकारकडून 2019 मध्ये मान्यता मिळाल्यानंतर या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम झाले. दोन वर्षात परळी - लातूररोड या 64 किलोमीटर अंतराच्या मार्गाचेविद्युतीकरणाचे कामही पूर्णत्वास गेले आहे.

हा प्रकल्प रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन, सिकंदराबाद प्रकल्प, सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन (CORE), प्रयागराजच्या द्वारे राबविला जात आहे. विकाराबाद लातूर रोड (204.25 - मार्ग किलोमीटर) हा विभाग विविध टप्प्यात पूर्ण करण्यात आला. लातूर रोड - परळी वैजनाथ ( 63.75 मार्ग किलोमीटर) विभाग सुरु झाल्यामुळे विकाराबाद परळी वैजनाथ (268 मार्ग किलोमीटर) पासून संपूर्ण विभाग पूर्ण झाला आहे. यामुळे सिकंदराबाद ते परळी वैजनाथ हा संपूर्ण ब्रॉडगेज विभाग 100% विद्युतीकृत झाला आहे. विभागाच्या विद्युतीकरणामुळे विभागात अतिरिक्त गाड्या सुरु होण्यास मदत होते. भारतातील अंदाजे 37% गाड्या डिझेल लोकोसह आहेत, जे एकूण ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाच्या 4%साठी  आहेत. 2020-21 या वर्षात एकूण डिझेलचा वापर  होतो.

सिकंदराबाद- परळी वैजनाथ हा संपूर्ण ब्रॉडगेज विभाग 100% विद्युतीकृत झाला आहे. विभागाच्या विद्युतीकरणामुळे विभागात अतिरिक्त गाड्या सुरु होण्यास मदत होते. भारतातील अंदाजे 37% गाड्या डिझेल लोकोसह आहेत, जे एकूण ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाच्या 4% साठी जबाबदार आहेत. 2020-21 या वर्षात एकूण डिझेलचा वापर 11,75,901 किलो लिटर होता. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे डिझेल आयातीची गरज कमी होण्यास आणि ग्रीनहाऊस गॅसेसमध्येही घट होण्यास मदत होते. यामुळे 2030 पर्यंत 'नेट झिरो' कार्बनचे लक्ष्य गाठण्यात मदत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?