धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:अंबाजोगाई बसस्थानकात शिवशाहीने परळी तालुक्यातील वृध्दास चिरडले

 अंबाजोगाई बसस्थानकात शिवशाहीने परळी तालुक्यातील वृध्दास चिरडले




अंबाजोगाई - दवाखान्यात दाखल असलेल्या सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे जाण्यासाठी अंबाजोगाई बस स्थानकात आलेल्या वृद्धाला प्रवेशद्वारावर शिवशाही बसने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला.


मनोहर वैजनाथ सुरवसे (वय ५२, रा. वानटाकळी ता. परळी) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी कि, मनोहर यांची सून डिलिव्हरीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल आहे. शुक्रवारी (दि. ३०) मनोहर हे सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाकडे आले. यावेळी रात्री ९.१५ वाजता बस स्थानकात प्रवेश करत असलेल्या बीड- हैद्राबाद या शिवशाही बसने (एमएच ०९ एफएल १०२१) मनोहर यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनोहर यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. ३१) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किरण मनोहर सुरवसे यांच्या तक्रारीवरून शिवशाही बसच्या चालकावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?