धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS: ◆महाराष्ट्र विद्यालयाची क्षेत्र भेट संपन्न;विदेशी पाहुण्यांना दिली देशाची ओळख

 ◆महाराष्ट्र विद्यालयाची क्षेत्र भेट संपन्न;विदेशी पाहुण्यांना दिली देशाची ओळख




परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय, मोहा या शाळेतील उच्च प्राथमिक विभागाची दोन दिवसीय क्षेत्र भेट शैक्षणिक सहल सुरक्षित व उत्साहात संपन्न झाली.या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी विदेशी पाहुण्यांशी मनमोकळेपणाने संवाद करत आपल्या देशाची ओळख करून दिली.


विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या शाळेतील उच्च प्राथमिक विभागाची क्षेत्र भेट सहली शनिवार दि 21 रोजी रवाना झाली.या क्षेत्र भेट सहलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी इ.स 735 मध्ये 200 वर्षे मेहनत करून निर्माण केलेला जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेली वेरूळ येथील कैलास लेणी याचा अभ्यास केला.या नंतर मार्गस्थ होत असताना घृष्णेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी 12 वे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वर, खुलताबाद येथील भद्रा मारोती या ठिकाणी भेट देत दर्शन घेतले तर रविवार दि 22 रोजी 12 व्या शतकातील सर्वाधिक शक्तिशाली उत्कृष्ट वास्तुकलेनचा नमुना असलेल्या देवगिरी अर्थात दौलताबाद किल्ल्यास भेट देत याठिकाणी असलेले २०० मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेल्या किल्ल्याचा बचाव खंदक,हिमनद्यांनी टेकडीच्या आजूबाजूला सर्वात जटिल आणि गुंतागुंतीच्या संरक्षण यंत्रणा, तटबंदी याची प्रत्यक्ष अनुभूती मधून माहिती घेतली.या नंतर मराठवाड्याची राजधानी शहर असलेल्या औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक ठिकाणे बीबी का मकबरा, बुद्ध लेणी, राज्यात प्रसिद्ध असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील विविध महत्वपूर्ण ठिकाणे व सिद्धार्थ उद्यान आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली.


ही क्षेत्र भेट यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक धंनजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली,जेष्ठ शिक्षक मुरलीधर बोराडे, सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक सुनील शिंदे,इंग्रजी विषयाचे शिक्षक महेश रोकडे व सामान्य विज्ञान विषयाचे शिक्षक अनुप कुसुमकर यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?