MB NEWS:पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; शिंदे गटात उत्सुकता; भाजपचा मात्र सावध पवित्रा

 पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; शिंदे गटात उत्सुकता; भाजपचा मात्र सावध पवित्रा





      

मुंबई  : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोरील सुनावणी या महिन्यात होणार असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने मात्र सावध पवित्रा घेत मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत असलेल्या कुठल्याही तारखेवर भाष्य करणे टाळलेले दिसते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर घटनापीठासमोर, तर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याच महिन्यात होणारी सुनावणी आपल्याच बाजूने होईल, असा दावा शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडूनही केला जात आहे. या सुनावणीच्या भरवशावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असे भाकीत शनिवारी नाशिकमध्ये पुन्हा केले. हे सरकार व्हेंटिलेटरवर असून ते काढले की हे राम झालेच म्हणून समजा, असे ते म्हणाले. त्यास उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रिपदाचे दावेदार संजय शिरसाट यांनी राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळल्याचे सांगत शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात होत असल्याचे सांगितले. शिंदे गटातील चर्चेनुसार २० किंवा २२ जानेवारी दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. भाजपाने मात्र विस्ताराच्या शक्यतेवर कोणतेही भाष्य केलेले नाही. भाजपकडून मंत्रिपदासाठी कुठली नावेही चर्चेत आलेली नाहीत. भाजपा आपले पत्तेच उघडे करत नसल्यामुळे शिंदे गटातील मंत्री होण्यास इच्छुक असलेले नेते अस्वस्थ असल्याचे समजते.

मागील सहा महिन्यांपासून घटनापीठ आणि निवडूक आयोग या दोन्ही सुनावण्या प्रलंबित होत्या. आता सुनावणीच्या तारखा जवळ आल्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. त्यामध्ये भरतशेठ गोगावले, प्रकाश अबिटकर, ज्ञानराज चौगुले, प्रकाश सुर्वे, संजय शिरसाट, सुहास कांदे, लता सोनावणे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. शिव- सेनेला दादरमध्ये सुरुंग लावणारे सदा सरवणकर यांचेही नाव मंत्रिपदासाठी घेतले जात आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांनीही मंत्रिपदासाठी दंड थोपटले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?