MB NEWS:सुसंवाद व विश्वास संपल्याने तरुणाई अधोगतीकडे :वैद्यनाथ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात कवी साळेगावकर

 सुसंवाद व विश्वास संपल्याने तरुणाई अधोगतीकडे :वैद्यनाथ महाविद्यालयाच्या  स्नेहसंमेलनात कवी साळेगावकर



   परळी वैजनाथ,दि.२९--

                 आधुनिक समाजमाध्यमांचा वाढता दुरुपयोग व चंगळवादी दुनियेची बेसुमार अगतिकता यांमुळे आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यासाठी तरुणाईने माणुसकी, प्रेम, सामाजिक भान व राष्ट्रभक्ती इत्यादी श्रेष्ठ गोष्टींशी स्वतःला जोडून घ्यावे, असे आवाहन प्रसिद्ध कवी श्री प्रभाकर साळेगावकर यांनी केले.

      येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात काल (शनिवारी) आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम हे होते. सामाजिक कार्यकर्ते श्री राजसिंह शेखावत यांच्या हस्ते यावेळी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विष्णू कुलकर्णी, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. पी. एल. कराड, उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका प्रा. एम.व्ही. पेकमवार, समन्वयक यू. आर.कांदे, विद्यार्थी संसद प्रतिनिधी कु. अंजली मुंडे इत्यादी उपस्थित होते. 

          श्री साळेगावकर यांनी यावेळी विविध विषयांवरील विडंबनपर कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व रसिकांची मने जिंकली. ते म्हणाले - 'तरुण पिढीचे भवितव्य आज धोक्यात येत असून ते मानवी मूल्यांपासून दूर चालले आहेत. उत्तम नागरिक घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टी ठेवावी. निर्भेळता व निर्मळता हे संवादाचे माध्यम आहे. ज्या ठिकाणी यांचा अभाव असतो,तेथे विसंवाद निर्माण होतो. तसेच विश्वास हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःसह  थोरामोठ्यांचा विश्वास संपादन केला, तर जीवन यशस्वी ठरू शकते. त्याबरोबरच महापुरुषांचे जीवन चरित्र व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेही नवी दिशा प्राप्त होते, असेही ते म्हणाले.

                उद्घाटक श्री शेखावत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की मानवी जीवन हे अमूल्य असून त्याचा नेहमी सदुपयोग करावा. उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रामाणिकता, वेळेचा सदुपयोग आणि महापुरुषांचे आदर्श या गोष्टी अंगी बाळगाव्यात. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ असून मानवी मूल्यांच्या जोपासनेसाठी त्यांनी अर्निश प्रयत्न करावेत, असे सांगितले.

        यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धा व उपक्रमात यशस्वी ठरलेल्या आणि वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.  प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला, तर स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्रो. डॉ. एमजी लांडगे यांनी स्नेहसंमेलनाचा अहवाल मांडला. पाहुण्यांचा परिचय डॉ. नयनकुमार आचार्य यांनी करून दिला, तर  सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना चव्हाण व प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. एम. एल. देशमुख यांनी मानले. दरम्यान द्विदिवसीय स्नेहसंमेलनात आनंद नगरी, शेलापागोटा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि इतर कार्यक्रम पार पडले. हे यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?