MB NEWS:सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

 सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित




नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळच्या वतीने ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यरांच्या हस्ते वितरण


मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा  राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

         श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी सामाजिक, आरोग्य  क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत कार्य करत आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनेचा 34 हजार पेक्षा नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. गेली 10 वर्ष वैद्यकीय सेवा केलेली आहे. रूग्णसेवा करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. परंतु एक माणूस म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम या भागात उभारले आहे. कोरोनाच्या काळात असंख्य गोर-गरीबांना व सर्वसामान्यांना मदतिचा हात दिला आहे. 


वैद्यकीय सेवेत असताना अनेक रुग्णानाचे जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न हा माणूसकीचे दर्शन घडवितो. सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला.


       नाथ्रा येथे 6 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा ता.परळी वैजनाथ आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे मुख्यसंयोजक डॉ एकनाथ मुंडे ,संस्थेचे सचिव डॉ संतोष मुंडे तसेच कार्यक्रमाचे प्रसिद्ध दंगलकार कवी डॉ स्वप्नील चौधरी, अध्यक्ष न.प.परळीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रसिद्ध साहित्यिक नागनाथ बडे,प्रा विठ्ठल जायभाय , राजेंद्र पाठक, डॉ रमेशचंद्र काबरा,संपादक सतिश बियाणी, सामाजिक कार्यकर्ते भास्करमामा चाटे, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली लांब,परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे साहेब,उपनिरीक्षक गणेश झाम्बरे साहेब, सौ.शुभांगीताई गित्ते,  संमेलनाच्या कार्यवाहक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  सदरील पुरस्काराचे विशेष समारंभात वितरण करण्यात आले. यामध्ये स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी डाॅ.रविंद्र जगतकर म्हणाले की, मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांचे सामाजिक, वैद्यकीय व सर्व क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?