धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:२२ जानेवारीला कार्यशाळा झाली तर, १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची  कु.सेजल गायकवाड विद्यार्थिनीला  परभणी  येथे मिळाली 'पिको सॅटॅलाइट' बनवण्याची संधी


२२ जानेवारीला कार्यशाळा झाली तर, १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण


 परळी (प्रतिनिधी) 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल - फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम्' आयोजित आणि स्पेस झोन इंडीया, मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त  विद्यमाने "डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३" साठी बीड, औरंगाबाद , परभणी जिल्ह्यातील विविध शाळामधील  विद्यार्थ्यांना 'पिको उपग्रह (satellite)' बनवण्याची संधी मिळाली आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील पट्टीपुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे १५० पिको सॅटॅलाइट पुन्हा वापरता येणाऱ्या किटच्या साह्याने अवकाशात सोडले जाणार  आहेत. यासाठी देशभरातील ५००० विद्यार्थ्यांनी ऑनलाईने प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी कु सेजल चंद्रकांत गायकवाड ( वर्ग -8 वी) हिने घेतले आहे.


या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आँचल गोयल ,मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ,शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते . देशाला भविष्यात लागणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या कार्यशाळेतून मिळतील असा आशावाद जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.


नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 22 जानेवारी रोजी परभणी येथे एकदिवसीय विभागीय कार्यशाळेत विद्यार्थ्यानी पिको सॅटेलाइट प्रत्यक्षरित्या बनवले आहेत. त्यानंतर देशभरातून स्पर्धेत क्षमता सिद्ध केलेल्या १०० मुलांची निवड केली जाईल. निवड झालेले है विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रकिट बनविणार आहेत. या उपक्रमाची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ' तसेच जागतिक पातळीवरील इतर पाच संस्था घेणार आहेत.  अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे

जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषाताई चौधरी यांनी दिली. तसेच मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य श्रीरंग औचरमल, बीड जिल्हा समन्वयक चंद्रकांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सदर विद्यार्थिनीला कार्यशाळेसाठी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेब,जिल्हा प्रा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी,परळी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी एन व्ही सोनवणे,शाळेच्या अध्यक्षा सौ उषा किरण गित्ते मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुपे सर यांनी कु सेजल चंद्रकांत गायकवाड हिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?