धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:प्रकल्पग्रस्ताचे नेते फुलचंद कराड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

 प्रकल्पग्रस्ताचे नेते फुलचंद कराड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

महानिमितीचे संचालक विश्वास पाठक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 10 जानेवारीला प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नासाठी महत्वपूर्ण बैठक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : 

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कृती समितीच्या वतीने परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत होते. विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. नाशिक, चंद्रपूर, खराडीसह परळी वैजनात येथील प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हे आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. महानिर्मितीचे वरिष्ठ संचालक विश्वास पाठक यांच्याशी फुलचंद कराड यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करावा असे आवाहन केले होते. याबाबत येत्या १० जानेवारी रोजी मुंबई येथील कार्यालयात अधिकची चर्चा करण्याची आश्वासन कंपनीकडून लेखी देण्यात आले आहे.


महानिर्मीती व इतर कंपन्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचा कायमस्वरूपी समावेश करून घ्यावा या मागणीसाठी गेल्या 10 दिवसापासून औष्णिक विघुत केंद्राच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. आज दि.02 जानेवारी प्रकल्पग्रस्ताचे नेते तथा भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी उपोषणकर्त्यांची बाजू घेवून महानिर्मीतीचे मुख्य अभियंता बदाने यांच्याशी चर्चा केल्या नंतर महानिर्मितीचे वरिष्ठ संचालक विश्वास पाठक यांच्याशी  फुलचंद कराड यांनी दुरध्वनीव्दारे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी लोकशाही पध्दतीने न्याय मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या बाबात वरिष्ठ संचालक विश्वास पाठक, मुख्याभियंता बदाने व फुलचंद कराड यांच्यात दीर्घ काळ चर्चा झाली. या चर्चेअंती उपोषणकर्त्यांची फुलचंद कराड व महानिमित्तीचे मुख्य व्यस्थापक बादाने यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान उपोषणकर्त्यांशी विचार विनिमय व चर्चा करून सुरू केले उपोषण मागे घेण्याचे ठरले.  महानिर्मीत्ती कंपनीच्या वतीने बदाने यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते फुलवं कराड व उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले.


मुख्याभियंता येनी दिलेल्या लेखी पत्रात मध्ये म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व त्यांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे दि.10 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता महानिर्मितीचे वरिष्ठ संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत चर्चा होणार असून त्या चर्चेचा झालेला प्रस्ताव राज्याचे उपमुख्यामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.  प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न बाबत महत्व पुर्ण बैठक होणार आहे. आज दि.02 जानेवारी फुलचंद कराड यांच्या मदतीने प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या उपोषणकर्त्यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले.  उपोषणार्थी सुधिर फड, केशव तिडके, गोविंद महाराज मुंडे, भगतसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर चांगिरे, विजय पाळवदे, सुंदर चाटे, गौतम रोडे, प्रदीप नागरगोजे, विलास मुंडे, गुलाब अजमिर शेख, नामदेव मुंडे, सचिन फड, वाल्मिक चाटे आदींनी उपोष मागे घेत असल्याचे स्वाक्षरी असलेले पत्र महानिर्मितीला दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?