MB NEWS:राजमाता जिजाऊ जयंती निमित्त संगम येथे दि.१२ रोजी राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा

 राजमाता जिजाऊ जयंती निमित्त  संगम येथे दि.१२ रोजी राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      राजमाता जिजाऊ जयंती निमित्त संगम येथे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाज कार्यात सक्रीय सहभाग असणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक :- ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अ.भा. वारकरी मंडळ) यांनी दिली आहे.


        राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्कार वितरण सोहळा संगम येथे दि.१२ जानेवारी रोजी सायं.६ वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप बँकेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके,ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्र.पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,जागृती ना.पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभाताई गंगाधर शेळके, राजाभाऊ गिराम, नगरसेविका शोभाताई भास्करराव चाटे,सरपंच अच्युत चव्हाण, उपसरपंच निलाबाई कामाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वा. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल.

     तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सौ. वच्छलाबाई वैजनाथ कोकाटे (मा.सरपंच, संगम, ता. परळी वै.), आयोजक :- ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अ.भा. वारकरी मंडळ) यांनी केले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?