पोस्ट्स

MB NEWS-दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे*

इमेज
 * दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ* *बीड जिल्ह्याचा 'स्पेशल डे' पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस - ना. मुंडे* परळी (दि. 05) ---- : सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा

MB NEWS-पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_

इमेज
 * पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केला डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान* *सेवा यज्ञातील योगदानाबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!* _महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार_ परळी । दिनांक ०४।  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डाॅक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला, त्यांच्यामुळेच अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले, त्यांचे ऋण कदापि विसरू शकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यां बरोबरच सेवा यज्ञासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप देत ॠण व्यक्त केले.    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सेवा यज्ञाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, भाजपचे  ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँक

MB NEWS-लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण* *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*

इमेज
 * लोकनेत्याच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभाग करणार गौरव* *गोपीनाथराव मुंडे यांच्या पोस्टल इन्व्हलपचे ३ जून रोजी लोकार्पण*  *दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी होणार ऑनलाईन कार्यक्रम*  परळी । दिनांक ०१।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३ जून रोजी होत आहे. दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, पिडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ३ जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे. *पोस्टल इन्व्हलपचे लोकार्प

MB NEWS-महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती

इमेज
  महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)                 शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्ती बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.                येथील लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे.परळीकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाल्याने प्राचार्य पद रिक्त झाले होते. या जागी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्ती बदल बोलताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी सांगितले की, महाविद्यालयाची गेल्या २४ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून स्वर्गीय प्

MB NEWS- *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार*

इमेज
 *पो.नि.शिवलाल पुरभे सेवानिवृत्त ; ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि.म्हणुन मुंडे यांनी स्विकारला पदभार* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे हे पोलिस दलातील प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले तसेच सप्तनिक त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कर्मचार्यांच्या वतिने निरोप समारंभाद्वारे निरोप देण्यात आला.तर प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन मारुती मुंडे यांनी पदभार स्वीकारला.        शिवलाल पुरभे यांनी आतापर्यंत गडचिरोली,औरंगाबाद,नागपूर,बीड व अन्य ठिकाणी पोलिस निरीक्षक म्हणुन सेवा बजावली तर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात ते मागील सोळा महिन्यापासुन रुजु होते.एक कर्तव्यदक्ष व कर्मचार्यांना सोबत घेवुन काम करणारे अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती होती.ग्रमीण पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांच्या वतिने छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते, पोलिस सहाय्यक निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक मनोज जिरगे, पोलिस नाईक हरिदास गिते, शि

MB NEWS- *सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण* 🕳️ *स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण*🕳️

इमेज
 *सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण*  🕳️ *स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण*🕳️   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....    राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "सेवाधर्म" हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी शहरात पुढील १५ दिवस निर्जंतुकिकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा आज दि.१ शुभारंभ करण्यात आला. येत्या १५ दिवसात गल्लोगल्ली निर्जंतुकिकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.      राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कोविड प्रादुर्भावतील लोकोपयोगी उपक्रम "सेवाधर्म" या मध्ये निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कै.पंडितअण्णा मुंडे भोजनालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोविड प्

MB NEWS-मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार

इमेज
  मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार परळी वैजनाथ, प्रतिनिधी       येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक/ प्राचार्य पदी शाळेचे जेष्ठ शिक्षक रमेश कोमवार यांची पदोन्नती ने नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य पवार हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.संस्थेचे अध्यक्ष अनंतराव जगतकर यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक/ प्राचार्य रमेश कोमवार यांचा सत्कार केला.त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       रमेश कोमवार हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तीमत्व आहे. शहरातील एक अभ्यासू, उपक्रमशील व संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद मा.विद्यालयात त्यांनी अध्यापन सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. मितभाषी परंतु कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. विद्यार्थी केंद्रित सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.सर्व सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी प्रिय असा मुख्याध्यापक/ प्राचार्य त्यांच्या माध्यमातून संस्थेला लाभला आहे. शाळा व महाविद्य

MB NEWS-ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ; आरक्षण प्रश्नांवर आवाज उठविणार* *औरंगाबादेत पंकजाताई मुंडे आक्रमक !* *महा विकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात सपशेल फेल !*

इमेज
 * ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ; आरक्षण प्रश्नांवर आवाज उठविणार* *औरंगाबादेत पंकजाताई मुंडे आक्रमक !* *महा विकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात सपशेल फेल !* औरंगाबाद । दिनांक ३१।  ओबीसी समाजाला आरक्षण आणि योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर हा समाज राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, यावर आवाज उठविणार असल्याचे सांगितले. ओबीसींच्या आरक्षणाची बाजू मांडण्याची महा विकास आघाडी सरकारची मानसिकताच नव्हती, यात सरकार सपशेल फेल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.    ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसींच्या आरक्षण प्रश्नांवर पंकजाताई मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोर्टाचा निर्णय धक्कादायक आहे. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं त्या म्हणाल्या. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असू तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक म

MB NEWS-आता कोव्हिड पाठोपाठ म्युकरमायकोसिस रुग्णांना ना.धनंजय मुंडे यांचा आर्थिक मदतीचा हात........! *म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी केली एक लाख रुपयांची मदत*

इमेज
  आता कोव्हिड पाठोपाठ म्युकरमायकोसिस रुग्णांना ना.धनंजय मुंडे यांचा आर्थिक मदतीचा हात........! *म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी केली एक लाख रुपयांची मदत* परळी (दि. 31) ---- :  कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाधर्म या उपक्रमाच्या माध्यमातून परळी मतदारसंघात सेवेचा यज्ञ सुरू केलेल्या सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील मांडवा येथील रहिवासी मधुकर प्रभाकर फड यांना वैद्यकीय उपचारांसाठी एक लाख रुपयांची मदत त्यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतिने केली आहे. मधुकर फड हे कोरोना पँझेटिव्ह होते यातच त्यांना म्युकर मायकोसिस या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असून, ते सध्या लातूर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांनी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली होती.  म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या भयावह आजारावर होणार खर्च खूप मोठा असून, पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या मार्फत मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे आम्हाला निश्चितच मोठा आधार मिळाला आहे, असे यावेळी मधुकर फड यांचे वड

MB NEWS-आजचा कोविड अहवाल परळी शहरासाठी दिलासादायक पण जबाबदारी वाढवणारा; ग्रामीण भागात ०६ पाॅझिटिव्ह

इमेज
  आजचा कोविड अहवाल परळी शहरासाठी दिलासादायक पण जबाबदारी वाढवणारा; ग्रामीण भागात ०६ पाॅझिटिव्ह परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झाली आहे. या अहवालात परळी तालुक्याची संख्या ०६ आहे मात्र परळी शहरातील आकडा निरंक आला आहे. दरम्यान शहरवासीयांना हा दिलासा असला तरी परळी शहर दररोजच्या आहवालात निरंक राहण्याची जबाबदारी वाढली आहे.          आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे.आज बीड जिल्ह्यात ५१६ पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. यामध्ये परळी तालुक्याची संख्या ०६ आहे. यात वर्गवारी केली तर शहरात संख्या निरंक आहे. जिल्ह्याची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोना संसर्गाची साखळी मात्र संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिका

MB NEWS-शिवाजीनगर लसिकरण केंद्रावर सावली अभावी जेष्ठ नागरिकांची उन्हात तगमग

इमेज
  शिवाजीनगर लसिकरण केंद्रावर सावली अभावी जेष्ठ नागरिकांची उन्हात तगमग स्वयंसेवी संस्थांनी निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शिवाजी नगर आरोग्य केंद्रावर तोबा गर्दी झाली.सकाळपासुनच लसिकरणासाठी निगरिकांनी केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. या केंद्रात बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने जेष्ठ नागरिक ताटकळले. शहरात लसिकरणासाठी काही सुटसुटीत व्यवस्था लागणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.      लसिकरणासाठी नागरिकांना सुव्यवस्था देण्याची गरज आहे मात्र प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागातील लोकच संभ्रमात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागरिकांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.शिवाजी नगर येथील लसीकरण केंद्रावर जेष्ठांची गैरसोय तळपत्या उन्हात लसीकरनासाठी 45 वरील नागरिक व वयोवृद्ध नागरिक तासन तास रांगेत उभे असून यातच ज्यांना रक्तदाब,मधुमेह आहेत अशा व्यक्तीचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. कोणत्याही प्रकारे निवारा अथवा सावली मिळेल अशी व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे याकडे परळी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी लक्ष दे

MB NEWS- *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी*

इमेज
 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी*  सोनपेठ (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.                    कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमास प्र. मुख्याध्यापक यु.डी.राठोड, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद जोशी आर.बी., राठोड एस.एम., चव्हाण एस.जी., सोमनाथ सातपुते, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, मंचक चाफुले, दिलीप व्हावळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता. कार्यक्रमास कर्मचारी उपस्थित होते.

MB NEWS-लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी

इमेज
  लसीकरणासाठी प्रधानमंत्री केअर्स फंडला काशी पीठाकडून पाच लाख रु. देणगी वाराणसी (प्रतिनिधी) सनातन वीरशैव धर्माच्या पंचपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले काशी पीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आज प्रधानमंत्री केअर्स फंडला पाच लाख रुपये देणगी दिली. वाराणसीचे आयुक्त श्री दीपक अग्रवाल यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. यासंदर्भात जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, संपूर्ण देश कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले होते. जनता भयग्रस्त आहे. या स्थितीमध्ये सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. या क्षेत्रातील संशोधक आणि डॉक्टरांनी जनतेला लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला 5 लाख रुपये दिले आहेत असे महास्वामीजी म्हणाले. महास्वामीजी पुढे म्हणाले, लसीकरणाविषयी गैरसमज करून घेऊ नये. संशोधक आणि डॉक्टर यांच्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवावा. आपले रक्षण करणारे लसीकरणरुपी सुरक्षाकवच सर्वांनी अवश्य घ्यावे. याप्रसंगी काशी पीठाकडू

MB NEWS-बालासाहेब गित्ते यांना मातृशोक प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दुःखद निधन...!

इमेज
  बालासाहेब गित्ते यांना मातृशोक प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दुःखद निधन...! परळी प्रतिनिधी : शहरातील उद्योगपती तथा रामा टायर्स चे संचालक श्री बालासाहेब मारोती गित्ते यांच्या आई श्रीमती प्रयागबाई मारोती गित्ते यांचे दिनांक 30 मे रोजी सायंकाळी  6 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने  दुःखद निधन. प्रयागबाई गित्ते यांच्यावर आज  31 मे सोमवार रोजी त्यांचे राहते गाव वाघबेट येथे सकाळी 8 : 30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या त्या आज्जी होत्या, प्रयागबाई गित्ते यांच्या पश्चात एक मुलगा,सहा मुली, सून,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे

MB NEWS-सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन

इमेज
  सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे निधन झाले   भारतीय विद्यार्थी सेनेचे उप जिल्हा प्रमुख मोहन परदेशी यांच्या आई धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या अतिशय मनमिळाऊ सौ.कौशल्या जगदीश परदेशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते ६६ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान भारतीय विद्यार्थी सेना परळी वैजनाथ तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

MB NEWS-पंढरीनाथ सूर्यकर यांचे निधन; संपादक प्रकाश सूर्यकर यांना पितृशोक

इमेज
  पंढरीनाथ  सूर्यकर यांचे निधन;  संपादक प्रकाश सूर्यकर यांना पितृशोक              परळी (प्रतिनिधि) -शहरातील कंडक्टर कॉलनीतील रहिवाशी पंढरीनाथ   हनुमंतराव (माळी) सूर्यकर यांचे वृद्धपकाळाने दि. 30 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.मृत्यूसमयी ते 100 वर्षाचे होते.  दैनिक दिव्यअग्नीचे संपादक प्रकाश सुर्यकर यांचे ते वडील होत. त्यांच्या    पार्थिवावर शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी येथे सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,   सहा मुले,  दोन मुली, सुना,  नातवंडे असा  भरगच्च परिवार आहे. सुर्यकर कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे*

इमेज
 * जिवलग मित्र आणि सहकारी गमावला - धनंजय मुंडे* परळी दि. 29 --- परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबू नंबरदार हे महा विकास आघाडीतील काँग्रेस या घटक पक्षाचे परळी शहराध्यक्ष म्हणून सहकारी तर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे आणि माझे जिवलग मित्राचे नाते होते आज मी माझा जिवलग मित्र गमावला आहे अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. बाबु नंबरदार यांच्यासोबत आपण विद्यार्थी दशेपासून सोबत होतो. अनेक वर्षे सोबत क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटचे वेड असलेले बाबू नंबरदार हे संपूर्ण बीड जिल्ह्यात आपल्या शैलीमुळे परळीचे अझरुद्दीन  म्हणून प्रसिद्ध होते.  क्रिकेट सोबतच परळीच्या राजकीय सामाजिक जीवनातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनाने परळीच्या क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

MB NEWS-परळीवरच्या सुक्ष्म सुरक्षा नजरेची 'नजरबंदी' : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

इमेज
    परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.सध्या कोरोना काळात शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे.        परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळपास ५२ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.यापैकी बहुतांश सीसीट

MB NEWS-गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण

इमेज
 * गाढे पिंपळगाव येथे माता रमाईस अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण                 परळी वैजनाथ ------ परळी तालुक्यातील  गाढे पिंपळगाव ता परळी येथे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सावली माता रमाई यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करुन बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी गाढे पिंपळगाव येथे सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे आणि योगेश जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर सचिन रणखांबे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद घुंबरे यांनी केले. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गाढे पिंपळगाव येथील स्मशानभूमीत बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन रणखांबे, ऑफ इंडिया पॅंथर सेनेचे परळी ता महासचिव विनोद घुंबरे, सुरज घागरमाळे, सिध्दार्थ घुंबरे, नितीन रोडे, हर्षद घुंबरे, प्रदिप घुंबरे, योगेश जगताप आणि रंजित घुंबरे आदिंनी परिश्रम घेतले....

MB NEWS-*✍️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल*

इमेज
-----------------------------------------  *✍️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल* ------------------------------------------ मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे, गेले अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं आरोग्य हेच सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलवणं योग्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्

MB NEWS-परळी ब्लड डायरी तर्फे परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

इमेज
  परळी ब्लड डायरी तर्फे परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन परळी (प्रतिनिधी) :- दि २८ मे २०२१ कोरोना च्या पार्श्वभूमीवर रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी तर्फे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे जमाते इस्लामी हिंद परळीचा कार्यालयात रक्तदान शिबिरचा आयोजन करण्यात आलेला आहे सकाळी 10 ते दुपारी 04 पर्यंत हा रक्तदान शिबिर परळी ब्लड डायरी व इतर संघटना च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येत आहे जमात ए इस्लामी हिंद परळी, नय्यर ग्रुप ,खिदमत फाऊंडेशन , हजरत उमर फारुख ग्रुप, AK बॉईज, स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परळी, टिपू सुलतान युवा मंच परळी, एम पी जे परळी. या सर्व संघटनांचा समावेश आहे. रक्तदान शिबीर घेण्याचा उद्देश परळीत जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय ब्लड बँक अंबाजोगाई तिथून रक्त पुरवठा केला जातो सध्या कोरोना महामारी मुळे रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी च्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन केलेला आहे तरी सर्व परळीकरांना खास करून युवकांना विनंती आहे जास्तीत जास्त रक्तदान करून या परिस्थितीत सामान्य जन माणूस व शासनाला मद

MB NEWS-उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस

इमेज
  उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असुन उद्या दि.२८ रोजी कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. लसिकरणासाठी चे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी जाहीर केले आहे.

MB NEWS-महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला ✍️ शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाहिलेली शब्द श्रद्धांजली

इमेज
  महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला   ह .भ.प. पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! संत श्रेष्ठ वैकुंठवासी गुरूवर्य सोपान काकांच्या गादीचा खराखुरा वारस, सोपान काकांचे आमच्या समूळ समाजावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळेच समाजाच्या गळ्यात तुळशीची माळ पडली. आणि समाज आध्यात्मिक बनला. त्यांचे वारसदार वैराग्यमुर्ती, वै.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे आयुष्यभर नारदाच्या गादीचे निष्काम सेवक होते. कधीच मान-पान न पहाता केवळ भक्ती करत परळी तालुक्यातील हजारो लोकांना भक्ती मार्ग दाखवला. आणि आज महर्षी नारद जयंती दिनीच त्यांनी आपले अवतार कार्य संपविले.  वैकुंठवासी गुरूवर्य पुरुषोत्तम महाराज यांच्या आत्म्यास प्रभू श्री वैद्यनाथ चिरशांती देवो हीच प्रार्थना! माझ्या वतीने आणि आंधळे कुटुंबीयांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! उखळीकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच पांडूरंग चरणी प्रार्थना! 👏👏👏 ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ गोपाळ आंधळे,  शिक्षण सभापती,नगर परिषद परळी वैजनाथ.

MB NEWS-संत सोपानकाका महाराज उखळीकर भजनी फडाचे प्रमुख हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांचे देहावसान* ⬛ *_अस्सल वारकरी भजनानंदी व वारकरी आचरणातील 'मर्यादा पुरुषोत्तम' काळाच्या पडद्याआड_* ⬛

इमेज
 * संत सोपानकाका महाराज  उखळीकर भजनी फडाचे प्रमुख हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांचे देहावसान* ⬛  *_अस्सल वारकरी भजनानंदी व वारकरी आचरणातील  'मर्यादा पुरुषोत्तम' काळाच्या पडद्याआड_*  ⬛ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      परळी पंचक्रोशी तसेच परभणी,बीड जिल्ह्यासह आळंदी-पंढरपुरसह संपूर्ण वारकरी विश्वात आदरणीय व सर्व परिचित असलेल्या संत सोपानकाका महाराज  उखळीकर भजनी फडाचे प्रमुख हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांचे आज दि.२७   पहाटे ५ वा.सुमारास देहावसान झाले. वारकरी संप्रदायाचा खराखुरा पाईक व वारकरी आचरणातील सर्व मर्यादा आयुष्यभर तंतोतंत पालन करणारा अस्सल वारकरी भजनानंदी व आचरणातील वारकरी 'मर्यादा पुरुषोत्तम' काळाच्या पडद्याआड गेला असल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.        हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज सोपानकाका महाराज उखळीकर यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीस्वास्थ्य ठिक नव्हते. यातच वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार हभप केशव महाराज उख

MB NEWS-वाढदिवस साजरा करत कोवीड सेंटरवर रूग्णांना वाचनिय ग्रंथांचे वितरण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम

इमेज
 ------------- वाढदिवस साजरा करत कोवीड सेंटरवर रूग्णांना वाचनिय ग्रंथांचे वितरण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम ------------- परळी वैजनाथ, दि.26, ()ः- कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, त्यांचे मन आनंदित व प्रसन्न रहावे यासाठी वाढदिवस साधेपणाने साजरा करत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी कोरोना बाधित रूग्णांना कोवीड सेंटरवर जावून विविध ग्रंथाचे वितरण केले. श्री शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष या पदावर असलेले येथील श्री देशमुख यांचा बुधवारी (दि.26) वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता शहरातील विविध कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना सेंटरवर जावून पुस्तकाचे वाटप केले. यामुळे रूग्णांमध्ये आनंदाची भावना होती. आता आमचा वेळ सत्कारणी लागून वाचनात जाईल अशी प्रतिक्रिया रूग्णांनी यावेळी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते विविध केंद्रावर श्री देशमुख यांनी या पुस्तकाचे वाटप केले. दरम्यान, शहरातील पत्रकार बांधवाना मास्क,