MB NEWS-परळीवरच्या सुक्ष्म सुरक्षा नजरेची 'नजरबंदी' : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

   परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.सध्या कोरोना काळात शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे.
       परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळपास ५२ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.यापैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद आहेत.या सीसीटीव्ही यंत्रणेची आॅपरेटिंग पोलीस प्रशासनाकडून केली जाते. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून ही यंत्रणा बंद झाली आहे.रस्ते सुरक्षा, वाहतूक , सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटना आदी सर्व सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त आहे.परंतु ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने शहराची सुरक्षाच धोक्यात आली आहे.गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त असतांना, ही यंत्रणा पोलीसांसाठी मदतीचा हात ठरत असतांनाही या तीसर्‍या डोळ्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
@@@
 सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा 
            परळी शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेकडे अनेक वेळेला लक्ष वेधले आहे. मात्र अद्याप याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार