इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-वाढदिवस साजरा करत कोवीड सेंटरवर रूग्णांना वाचनिय ग्रंथांचे वितरण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम

 -------------

वाढदिवस साजरा करत कोवीड सेंटरवर रूग्णांना वाचनिय ग्रंथांचे वितरण



सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम

-------------

परळी वैजनाथ, दि.26, ()ः-

कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, त्यांचे मन आनंदित व प्रसन्न रहावे यासाठी वाढदिवस साधेपणाने साजरा करत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी कोरोना बाधित रूग्णांना कोवीड सेंटरवर जावून विविध ग्रंथाचे वितरण केले.

श्री शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष या पदावर असलेले येथील श्री देशमुख यांचा बुधवारी (दि.26) वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता शहरातील विविध कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना सेंटरवर जावून पुस्तकाचे वाटप केले. यामुळे रूग्णांमध्ये आनंदाची भावना होती. आता आमचा वेळ सत्कारणी लागून वाचनात जाईल अशी प्रतिक्रिया रूग्णांनी यावेळी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते विविध केंद्रावर श्री देशमुख यांनी या पुस्तकाचे वाटप केले. दरम्यान, शहरातील पत्रकार बांधवाना मास्क, सॅनिटायझर, पुस्तक अशा कोरोना किटचे वितरणही वाढदिवसानिमित्त श्री देशमुख यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या