इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार

 मिलिंद विद्यालय मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी रमेश कोमवार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक/ प्राचार्य पदी शाळेचे जेष्ठ शिक्षक रमेश कोमवार यांची पदोन्नती ने नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य पवार हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.संस्थेचे अध्यक्ष अनंतराव जगतकर यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक/ प्राचार्य रमेश कोमवार यांचा सत्कार केला.त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    


 रमेश कोमवार हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तीमत्व आहे. शहरातील एक अभ्यासू, उपक्रमशील व संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद मा.विद्यालयात त्यांनी अध्यापन सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. मितभाषी परंतु कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. विद्यार्थी केंद्रित सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.सर्व सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी प्रिय असा मुख्याध्यापक/ प्राचार्य त्यांच्या माध्यमातून संस्थेला लाभला आहे. शाळा व महाविद्यालयाची  गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून सर्वांचे सहकार्य, संस्था अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचा आलेख  आणखी वाढवून विद्यार्थ्यांना  दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देवून गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही या नियुक्ती नंतर कोतवाल यांनी दिली.त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या