MB NEWS-महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला ✍️ शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाहिलेली शब्द श्रद्धांजली

 महर्षी नारदाच्या गादीचा निष्काम सेवक परळी पंचक्रोशीने गमावला; नारद जयंतीलाच इहलोकीचा प्रवास सोडला 



ह .भ.प. पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

संत श्रेष्ठ वैकुंठवासी गुरूवर्य सोपान काकांच्या गादीचा खराखुरा वारस, सोपान काकांचे आमच्या समूळ समाजावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळेच समाजाच्या गळ्यात तुळशीची माळ पडली. आणि समाज आध्यात्मिक बनला. त्यांचे वारसदार वैराग्यमुर्ती, वै.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे आयुष्यभर नारदाच्या गादीचे निष्काम सेवक होते. कधीच मान-पान न पहाता केवळ भक्ती करत परळी तालुक्यातील हजारो लोकांना भक्ती मार्ग दाखवला. आणि आज महर्षी नारद जयंती दिनीच त्यांनी आपले अवतार कार्य संपविले. 

वैकुंठवासी गुरूवर्य पुरुषोत्तम महाराज यांच्या आत्म्यास प्रभू श्री वैद्यनाथ चिरशांती देवो हीच प्रार्थना!

माझ्या वतीने आणि आंधळे कुटुंबीयांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

उखळीकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच पांडूरंग चरणी प्रार्थना!

👏👏👏

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️



गोपाळ आंधळे, 

शिक्षण सभापती,नगर परिषद परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार